​इशा गुप्ताने केले हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 10:53 IST2017-08-02T05:23:17+5:302017-08-02T10:53:17+5:30

​इशा गुप्ताने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले असून यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Isha secretly banana hot photoshoot | ​इशा गुप्ताने केले हॉट फोटोशूट

​इशा गुप्ताने केले हॉट फोटोशूट

ा गुप्ताने जन्नत 2 या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने राज थ्री डी, चक्रव्युह, गोरी तेरे प्यार में, हमशक्लस, बेबी, में रहूँ या ना रहूँ, रुस्तम, तुतक तुतक तुतिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. इशा गुप्ताच्या रूस्तम या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. इशाने गेल्या काही वर्षांत तिचे चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग निर्माण केले आहे आणि आता इशा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. 

Esha Gupta

इशा गुप्ता नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. तिने काही दिवसांपूर्वी देखील इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली होती. या व्हिडिओत तिने बिकनी घातलेली होती. तसेच तिने टॅटू डेच्या निमित्ताने देखील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत तर ती टॉपलेस आहे. या फोटोत ती तिचा टॅटू दाखवत आहे. या फोटोनंतर तिने आता पुन्हा एकदा तिचे काही हॉट फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केले आहेत. 

Esha gupta
तिने नुकतेच बिकनीमध्ये एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामला पोस्ट केले असून या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 
इशाने फोटो पोस्ट केल्यानंतर या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून या फोटोवर अनेक जणांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. इशाने या फोटोंमध्ये काळ्या रंगाची बिकनी घातली आहे. 

Esha gupta

 

Web Title: Isha secretly banana hot photoshoot