​ ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:35 IST2017-08-10T06:57:56+5:302017-08-10T12:35:29+5:30

इन्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो अपलोड करून इशा गुप्ता ट्रोलिंगची बळी ठरली. पण या ट्रोलिंगने इशाला काहीही फरक पडला नाही. उलट स्वत:चे त्याहीपेक्षा अतिशय बोल्ड फोटो पोस्ट करून इशाने ट्रोल करणा-याना खरमरीत उत्तर दिले आहे.

Isha Gupta turns 'topless' 'No Entry' for Trollers !! | ​ ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!!

​ ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!!

्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो अपलोड करून इशा गुप्ता ट्रोलिंगची बळी ठरली. पण या ट्रोलिंगने इशाला काहीही फरक पडला नाही. उलट स्वत:चे त्याहीपेक्षाअतिशय बोल्ड फोटो पोस्ट करून इशाने ट्रोल करणा-याना खरमरीत उत्तर दिले आहे. स्वत:चे दोननवे टॉपलेस फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या टॉपलेस फोटोंनी इंटरनेटवर जणू आग लावलीयं. तासाभरात ४० हजारांवर लोकांनी हे फोटो लाईक केलेत.
अगदी अलीकडे इशाने आपले टू पीसमधील अतिशय बोल्ड फोटो शेअर केले होते.  या फोटोंवरून इशा चांगलीच ट्रोल झाली होती. सोशल साईटवर अनेक युजर्सनी इशाच्या या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.‘क्या आपके पापाने इन तस्वीरों को देखा है?’ इथपर्यंत युजर्सने इशाला विचारून टाकले होते. पण युजर्सच्या या संतापाचा इशावर कुठलाच परिणाम झाला नाही. कारण मंगळवारी रात्री तिने त्याहीपेक्षा बोल्ड असे दोन फोटो शेअर करून सगळ्यांना अवाक केले. 
 

 


या फोटोत इशा टॉपलेस आहे. अर्थात  या फोटोंवरून इशाला ट्रोल होण्याचा धोका नाही. कारण या फोटोंला युजर्स केवळ लाईक करू शकणार आहेत. कारण इशाने या फोटोंवर एन्ट्री बंद केली आहे. म्हणजेच युजर्स या फोटोंवर कमेंट्स करू शकणार नाही. हे फोटो शेअर करताना ‘सभी निगाहें तुम्हारी तरफ है...’ असे कॅप्शन इशाने दिलेय.
 

 


एका फोटोला कॅप्शन देताना ‘हेल्दी लाईफ’असे तिने लिहिले आहे. आता हे फोटो पाहा आणि त्याला लाईक करायचे की नाही, ते तुम्हीच ठरवा!!
लवकरच इशा मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ या चित्रपटात दिसणार आहे. यात इशाचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. गत सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला गेला.

Web Title: Isha Gupta turns 'topless' 'No Entry' for Trollers !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.