ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:06 IST2025-10-03T12:04:57+5:302025-10-03T12:06:08+5:30
ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे अशी चर्चा सुरु झाली. काय घडलं होतं नेमकं? याचा खुलासा ट्विंकलनेच केला आहे

ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या तिच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Too Much With Kajol And Twinkle) या शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या नवीन एपिसोडमध्ये ट्विंकलने एक रंजक किस्सा सांगितला, ज्यामुळे तिच्या आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरला होता. आलिया भट या शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्यासमोरच ट्विंकलने हा खास खुलासा केला.
ट्विंकल ही ऋषी कपूरची मुलगी?
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या एपिसोडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन (Varun Dhawan) पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा ट्विंकलने आलियाचे सासरे ऋषी कपूर यांच्याबद्दलचा हा खुलासा केला. ट्विंकलने सांगितलं की, ऋषी कपूर यांनी अनेक वर्षांपूर्वी ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) गरोदर होत्या. ऋषी यांच्या पोस्टमुळे मोठा गैरसमज झाला आणि ट्विंकल ही ऋषी यांचीच मुलगी आहे, अशी चर्चा पसरली.
ट्विंकलने सांगितलं की, "आलियाचे सासरे (ऋषी कपूर) यांच्यामुळे जवळपास माझं आडनाव कपूर झालं होतं. माझ्या वाढदिवसाच्या ऋषी यांनी लिहिलं होतं की, 'ओह, ट्विंकल तुला माहित आहे... तू तुझ्या आईच्या पोटात असताना मी तुझ्यासाठी गाणी गायली होती.' या पोस्टमुळे अनेक लोकांना वाटू लागलं की, मी ऋषी कपूर यांचीच मुलगी आहे. ही चर्चा इतकी विचित्र स्तराला गेली की, ऋषी कपूर यांनी नंतर आणखी एक पोस्ट शेअर करून हा गैरसमज दूर केला, अशी माहिती ट्विंकलने दिली.
आलियाची प्रतिक्रिया
ट्विंकलने हा किस्सा सांगितल्यावर आलिया भटच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ही गोष्ट काजोल आणि ट्विंकलच्या लगेच लक्षात आली. यावर हसून ट्विंकल आलियाला म्हणाली, "मी तुझी नणंद नाहीये, त्यावेळी ती एक चूक होती." तेव्हा वरुण धवन म्हणाला, "आलियाला हे ऐकल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाहीये." दरम्यान, ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांनी 'बॉबी' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.