#AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:11 AM2023-01-22T10:11:15+5:302023-01-22T10:11:56+5:30

#AskSRK : ‘पठाण’ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेच, तसे एसआरकेचे चाहते क्रेझी झाले आहेत. चार वर्षांनंतर कमबॅक करणारा किंगखान ‘पठाण’या चित्रपटातून काय काय सरप्राईज घेऊन येतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

Is There Any Kissing Scene Between Shahrukh And Deepika In Pathaan Movie Actor Responds To Question | #AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

#AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

googlenewsNext

शाहरुख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमानं सध्या हवा केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आलीये आणि सोबतच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पठाण’चा वाद तुम्हाला ठाऊक आहेच. ‘पठाण’चं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आणि या पहिल्याच गाण्यानं वाद ओढवून घेतला. दीपिकाने या गाण्यात परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच गदारोळ झाला. कडव्या हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या. सोशल मीडियावर शाहरूख व दीपिकाच्या सिनेमाला बॉयकॉट करायची  मागणी झाली. अद्यापही हा वाद शमलेला नाहीये. पण ‘पठाण’ची रिलीज डेट जसजशी जवळ येतेच, तसे एसआरकेचे चाहते क्रेझी झाले आहेत.

चार वर्षांनंतर कमबॅक करणार असलेला किंगखान या चित्रपटातून काय काय सरप्राईज घेऊन येतो, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. एक उत्सुकता म्हणजे दीपिका व शाहरूखच्या किस सीनबद्दलचीही आहे. चित्रपटात शाहरूख व दीपिकाचा किसींग सीन असणार का? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अलीकडे  ‘AskSRK’ सेशनमध्ये शाहरूखच्या एका चाहत्याने किंगखानला नेमका हाच प्रश्न विचारला.   

या सेशनमध्ये बऱ्याच लोकांनी शाहरुखला एकापेक्षा एक भन्नाट प्रश्न विचारले आणि शाहरुखनेही या प्रश्नांना भन्नाट उत्तरं दिलीत. एका ट्विटर युझरने शाहरुखला असाच एक विचित्र प्रश्न विचारला.  “पठाण कोणाला कीस करणार?,” असा प्रश्न या चाहत्याने शाहरूखला केला. यावर शाहरुखने जबरदस्त उत्तर दिलं.
“आत्ता पठाण कीस करायला नव्हे, किक करायला आला आहे....”, असं उत्तर त्याने दिलं.
या उत्तरातून शाहरुखने ‘पठाण’मध्ये कोणताही किसिंग सीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चित्रपटात शाहरुख आणि दीपिका यांच्यात बरेच बोल्ड सीन्स दिसले असले तरी त्यांच्यात ऑनस्क्रीन कीस पाहायला मिळणार नाही, असं शाहरूखच्या या उत्तरावरून तरी वाटतंय.

‘पठाण’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण अॅक्शन मोडमध्ये आहे. जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.

Web Title: Is There Any Kissing Scene Between Shahrukh And Deepika In Pathaan Movie Actor Responds To Question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.