श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चेवर सख्ख्या भावानं दिली प्रतिक्रिया, 'त्या' पोस्टवर कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:02 IST2026-01-14T13:00:06+5:302026-01-14T13:02:39+5:30
श्रद्धा २०२६ मध्येच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात होतं. यावर आता खुद्द श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चेवर सख्ख्या भावानं दिली प्रतिक्रिया, 'त्या' पोस्टवर कमेंट करत म्हणाला...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि लेखक राहुल मोदी यांच्या नात्याची चर्चा २०२४ पासून रंगत आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, श्रद्धा २०२६ मध्येच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात होतं. या बातमीने चाहते आनंदात असतानाच, श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर श्रद्धाच्या लग्नाबद्दलच्या एका व्हायरल पोस्टवर खुद्द तिचा भाऊ सिद्धांत कपूरनं कमेंट केली आहे. सिद्धांतने अतिशय मिश्किलपणे या बातमीला अफवा ठरवलं आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिलं, "ही तर माझ्यासाठीही बातमी आहे". सोबतच त्याने हसण्याचे आणि आश्चर्याचे इमोजी वापरलेत. सिद्धांतच्या या एका कमेंटने हे स्पष्ट केलं आहे की, श्रद्धाच्या लग्नाबद्दल ज्या काही चर्चा सध्या आहेत, त्यात सध्यातरी काहीही तथ्य नाही".
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी २०२४ मध्ये मुंबईत पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर अनेक पार्ट्या, डिनर डेट आणि चित्रपट प्रदर्शनावेळी ते एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले. अनंत अंबानींच्या लग्नातही त्यांच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले होते. राहुलने 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाचे लेखन केले आहे. ज्यामध्ये श्रद्धा मुख्य भूमिकेत होती.

श्रद्धा कपूरचे आगामी चित्रपट
लग्नाच्या चर्चा बाजूला ठेवल्या तरी श्रद्धा सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप व्यग्र आहे. 'स्त्री २' च्या ऐतिहासिक यशानंतर प्रेक्षक 'स्त्री ३' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा लवकरच एका अलौकिक शक्ती असलेल्या 'नागिन'च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे. तर सध्या ती 'ईठा' या बायोपिकचे शूटिंग करत आहे.