राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:22 IST2025-06-02T10:21:24+5:302025-06-02T10:22:00+5:30

आलियाने नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रणबीर कपूरच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

is alia bhatt pregnant ranbir kapoor said i want second child also daughter | राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. आलियाने नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रणबीर कपूरच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मला दुसरीही मुलगीच हवी, असं वक्तव्य रणबीरने केलं आहे. "मला नेहमी मुलगीच हवी होती. जर मला दुसरं मूल झालं तर मला तीदेखील मुलगीच हवी आहे. कारण, मला नेहमीच मुलगी हवी होती", असं रणबीर एका मुलाखतीत म्हणाला होता. अॅनिमल सिनेमाच्या प्रमोशनवेळी रणबीरने त्याच्या कुटुंबाबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. त्यामुळे आलिया पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 


दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया-रणबीरने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच आलियाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव राहा असं आहे. 

Web Title: is alia bhatt pregnant ranbir kapoor said i want second child also daughter