'सैयारा' फेम अनीत पड्डाला डेट करतोय अहान पांडे? करण जोहरने दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:58 IST2025-11-20T12:58:15+5:302025-11-20T12:58:50+5:30
Ahan Panday And Aneet Padda : अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी 'सैयारा' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर बंपर कमाई केली. चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर काही काळानंतर या ऑनस्क्रीन कपलचा रोमान्स आता ऑफस्क्रीनमध्ये बदलल्याची चर्चा होते आहे.

'सैयारा' फेम अनीत पड्डाला डेट करतोय अहान पांडे? करण जोहरने दिली हिंट
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी 'सैयारा' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवर बंपर कमाई केली. अनीत पड्डा आणि अहान पांडेच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या दोन युवा कलाकारांच्या केमिस्ट्रीने लोकांच्या मनात घर केले. चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर काही काळानंतर या ऑनस्क्रीन कपलचा रोमान्स आता ऑफस्क्रीनमध्ये बदलल्याची चर्चा होती. आता इंडस्ट्रीचा गॉसिप किंग करण जोहरनेही इशाऱ्यांमध्ये या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने नुकतीच सानिया मिर्झाच्या 'सर्व्हिंग इट विथ सानिया' या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या टॉक शोमध्ये सानिया मिर्झासोबतच्या संवादात करण जोहरने अनीत पड्डा आणि अहान पांडे यांच्या रिलेशनशीपबद्दल एक मोठी हिंट दिली, ज्यामुळे हे जोडपे आता त्यांचे नाते सार्वजनिक करण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे.
करण जोहरने अहान-अनीतच्या नात्यावर दिली हिंट
अहान पांडे आणि अनीत पड्डाच्या नात्याबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला, "अद्याप दोघांनीही आपले नाते अधिकृत केलेले नाही. मला जास्त माहिती नाही कारण मी माहिती काढलेली नाहीये." विशेष म्हणजे, १३ ऑक्टोबर रोजी अनीत पड्डाच्या वाढदिवसानिमित्त तिला अहान पांडेसोबत एका कॉन्सर्टमध्ये पाहण्यात आले होते, त्यानंतर या कपलच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी आणखी जोर धरला होता.
तेजा सज्जाच्या 'मिराई'च्या पत्रकार परिषदेदरम्यान करण जोहरने अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' चित्रपटाच्या यशाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. चित्रपट निर्मात्याने म्हटले होते की, प्रत्येक चित्रपटाची स्वतःची कथा आणि स्वतःचे नशीब असते. कधीकधी नवख्या कलाकारांचे चित्रपटही सुपरहिट होतात, तर कधी सुपरस्टार्सची जादूही अयशस्वी ठरते.