Death Anniversary : शेवटपर्यंत इरफान खानची ही इच्छा राहिली अपूर्णच, अभिनेत्याची पत्नी सुतापाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 10:54 IST2021-04-29T10:54:17+5:302021-04-29T10:54:47+5:30

मागील वर्षी २९ एप्रिलला इरफान खानने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

Irrfan Khan's wish remained unfulfilled till the end, revealed the actor's wife Sutapa | Death Anniversary : शेवटपर्यंत इरफान खानची ही इच्छा राहिली अपूर्णच, अभिनेत्याची पत्नी सुतापाने केला खुलासा

Death Anniversary : शेवटपर्यंत इरफान खानची ही इच्छा राहिली अपूर्णच, अभिनेत्याची पत्नी सुतापाने केला खुलासा

अभिनेता इरफान खानच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी २९ एप्रिलला इरफान खानने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. इरफानशी निगडीत किस्से, स्टोरी आणि अपूर्ण इच्छा त्याच्या पत्नी सुतापाने एका वर्षानंतर सांगितली आहे. इरफानच्या निधनाला एक वर्षे उलटल्यानंतर सुतापाने इरफानच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेबद्दल सांगितले.


टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुतापाने सांगितले की, इरफानच्या जाण्यामुळे तिचे एकटेपणा अजून गेलेला नाही. तिला पुन्हा कामाला सुरूवात करायचे आहे. तिला लिखाणासाठी ऑफरदेखील मिळत आहे, मात्र तिला काम करता येत नाही.


मुलाखतीत सुतापाने खुलासा केला की, इरफान खानला मुलगा बाबिलसोबत चित्रपट बनवायचा होता. पण आता असे होऊ शकणार नाही. तिने सांगितले की, तो स्वतःसाठी आणि बाबिलसाठी चांगली स्क्रीप्ट शोधत होता. तो म्हणत होता बाबिलचे असेच राहिले ना की अभिनयच करायचे आहे तर हा चित्रपट येतो आहे ना सुतापा..खूप चांगला सिनेमा आहे. चित्रपटाची कथा एका कोचची स्टोरी आहे जो स्पेशल मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देतो आहे आणि मुले टुर्नामेंटदेखील जिंकतात. त्यांनी सांगितले होते की, मी हा चित्रपट बाबिलसोबत करू इच्छितो. मला या चित्रपटात अभिनय किंवा दिग्दर्शन करायचे आहे. जर मी अभिनय करू शकलो नाही तर दिग्दर्शन करेन. मात्र कदाचित मला अभिनय केला पाहिजे. तो (इरफान) अशा प्रकारचे स्वप्न पाहत होते आणि योजना बनवत होते. मग  अचानक सगळे काही संपून गेले.


इरफान खानचा मुलगा बाबिल लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तो नेटफ्लिक्सवरील चित्रपट कालामधून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनविता दत्त करत आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचा व्हिडीओ ट्विट करत अनविता दत्तचे कौतुक केले होते.

Web Title: Irrfan Khan's wish remained unfulfilled till the end, revealed the actor's wife Sutapa