पीकर आए हो? प्रश्न ऐकून दुखावला इरफान खानचा मुलगा बाबील; असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:54 IST2021-03-30T10:50:16+5:302021-03-30T10:54:30+5:30

बाबाचा पुरस्कार घेण्यासाठी बाबील सोहळ्यात पोहोचला. बाबाचे कपडे घालून त्याने या सोहळ्याला हजेरी लावली. याचदरम्यान बाबीलसोबत असे काही घडले की...

Irrfan Khan's son Babil slams media for asking if he was 'high | पीकर आए हो? प्रश्न ऐकून दुखावला इरफान खानचा मुलगा बाबील; असे दिले उत्तर

पीकर आए हो? प्रश्न ऐकून दुखावला इरफान खानचा मुलगा बाबील; असे दिले उत्तर

ठळक मुद्देइरफानचा मोठा मुलगा बाबिल हा लंडन युनिव्हर्सिटीत शिकतो आणि हुबेहुब आपल्या बाबासारखा दिसतो.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबील काहीसा दुखावला आहे. होय, इरफान खानला मरणोत्तर बेस्ट अ‍ॅक्टर फिल्मफेअर अवार्ड जाहीर झाला आणि बाबील बाबाचा पुरस्कार घेण्यासाठी सोहळ्यात पोहोचला. बाबाचे कपडे घालून त्याने या सोहळ्याला हजेरी लावली.

बाबाच्या वतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर बाबील इतका इमोशनल झाला की, ढसाढसा रडला. याचदरम्यान सोहळ्यात बाबीलसोबत असे काही घडले की, ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

विचित्र प्रश्न अन् बाबीलचे परखड उत्तर

बाबील अवार्ड सेरेमनीत पोहोचला. यावेळी काही पत्रकारांनी त्याला असा काही सवाल केला की, बाबील मनातून खट्टू झाला. या घटनेनंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने इन्स्टास्टोरीवर लिहिले, ‘तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी फिल्मफेअर अवार्ड सोहळयाला हजेरी लावली होती. यावेळी 7 पत्रकारांनी मला पिऊन आला आहे का? असा सवाल केला. हा प्रश्न विचारण्याचे कारण काय तर माझ्या डोळ्यांचा लूक आणि साइज. शाब्बास मित्रांनो, काय शानदार संशोधन केले तुम्ही. मी युनिव्हर्सिटी सोडली तेव्हापासून मी पूर्णपणे नॅचरल आहे. पण माझा हाच नॅचरल चेहरा पाहून मी नशेत असल्यासारखा दिसतो, हे सांगून तुम्ही महान कार्य केले. त्यासाठी धन्यवाद. मी याच नॅचरल चेह-याचा वापर करणार आणि बॉलिवूडमध्ये कोट्यवधी रूपये कमावणार....’

इरफानचा मोठा मुलगा बाबिल हा लंडन युनिव्हर्सिटीत शिकतो आणि हुबेहुब आपल्या बाबासारखा दिसतो. तूर्तास  बाबीलच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात आहेत. 1995 मध्ये इरफान व सुतापा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. इरफान व सुतापाला आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान. अयान सध्या शिकतोय. ‘लाइफ ऑफ पाई’ या सिनेमात अयान आपल्या वडिलांसोबत म्हणजेच इरफानसोबत झळकला होता.

Web Title: Irrfan Khan's son Babil slams media for asking if he was 'high