इरफान खानच्या हिंदी मीडियमची रिलीज टेड पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 09:53 IST2017-05-03T11:42:02+5:302017-05-04T09:53:53+5:30

अमिताभ बच्चन यांच्या सरकार -3 बरोबरचा बॉक्स ऑफिस क्लाशेस टाळण्यासाठी इरफान खानच्या  हिंदी मीडियम या आगामी  चित्रपटाची रिलीज डेट ...

Irrfan Khan's Hindi media release postponed Ted | इरफान खानच्या हिंदी मीडियमची रिलीज टेड पुढे ढकलली

इरफान खानच्या हिंदी मीडियमची रिलीज टेड पुढे ढकलली

िताभ बच्चन यांच्या सरकार -3 बरोबरचा बॉक्स ऑफिस क्लाशेस टाळण्यासाठी इरफान खानच्या  हिंदी मीडियम या आगामी  चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 
आधी हा चित्रपट 12 मे ला चित्रपट रिलीज होणार होता. आता ही रिलीज टेड 19 मे करण्यात आली आहे. 12 मे रोजी सरकार -3 बरोबरच आयुष्मान खुराना आणि परिणीती चोप्रा यांचा मेरी प्यारी बिंदूसुद्धा रिलीज होणार आहे. ये क्लाशेस टाळण्यासाठी चित्रपटाच्या टीमने हा निर्णय घेतला. मात्र आता त्यांना बॉक्स ऑफिसवर फक्त एक चित्रपट प्रदर्शित करणे कठिण जातेय. त्यामुळे हा चित्रपट आता हाय गर्लफ्रेंडसोबत प्रदर्शित होणार आहे.  


हिंदी मीडियम या चित्रपटात इरफान खान एक लहान मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत तर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर या मुलीच्या आईची भूमिका साकारते आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरीने केले आहे. या चित्रपटात इरफान आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊ इच्छितो यासाठी तो तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करत असतो. 
मुलीचे अॅडमिशन चांगल्या शाळेत व्हावे यासाठी इरफान आणि त्याची पत्नी त्यांचे लाईफ स्टाइल बदलतात. हिंदी मीडियम या चित्रपटातून एक गंभीर विषय अत्यंत हलक्या फुलक्या अंदाजात प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इरफान खानने बॉलिवूडसोबतच अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. मात्र हिंदी मीडियममधील त्याची भूमिका सगळ्यात हटके आणि वेगळी आहे. इरफान आणि सबा कमरचा हा चित्रपट 19 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Irrfan Khan's Hindi media release postponed Ted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.