Babil Movie Qala Trailer : इरफान खानच्या लेकाचा धमाकेदार डेब्यू, बाबिलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:48 PM2022-11-16T12:48:45+5:302022-11-16T12:49:42+5:30

Irrfan Khan Son Babil Qala Official Trailer : होय, इरफानचा मुलगा बाबिल खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय आणि त्याचा पहिला सिनेमा ‘काला’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Irrfan Khan Son Babil Khan And Tripti Dimri Netflix Movie Qala Official Trailer | Babil Movie Qala Trailer : इरफान खानच्या लेकाचा धमाकेदार डेब्यू, बाबिलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

Babil Movie Qala Trailer : इरफान खानच्या लेकाचा धमाकेदार डेब्यू, बाबिलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

Irrfan Khan Son Babil Qala Official Trailer : इरफान खान (Irrfan Khan) हा सर्वांचा लाडका अभिनेता आज आपल्यात नाही. इरफान या जगातून गेल्यानंतर चाहते त्याचा मुलगा बाबिल खानला बॉलिवूडमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. चला तर प्रतीक्षा संपलीये....! होय, इरफानचा मुलगा बाबिल खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याचा पहिला सिनेमा ‘काला’चा ( Qala ) ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 6 सेकंदाचा हा ट्रेलर पाहून चाहते इरफानच्या लेकाच्या प्रेमात पडले आहेत.

या चित्रपटात बाबिलसोबत तृप्ती डिमरी (Tripti Dimri ) लीड रोलमध्ये आहे. अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्सने हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.

‘काला’ची कथा 1930 ते 40 च्या दशकातील आहे. तृप्ती या चित्रपटात एका पार्श्वगायिकेच्या रोलमध्ये आहे. ती अप्रतिम गाते. पण तुला संगीत आवडतं का? असा प्रश्न केल्यावर ‘नहीं, मुझे नफरत है,’ असं उत्तर ती देते. तिच्या या द्वेषामागे अनेक रहस्यं लपलेली आहेत. त्याचीच कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. बाबिलची या चित्रपटातील भूमिका नकारात्मक आहे की सकारात्मक हे ट्रेलर बघून स्पष्ट होत नाही. पण बाबिलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर बघून चाहते क्रेझी झाले आहेत. चाहते बाबिलला पाहून आनंदी आहेत आणि तृप्तीचा अभिनय पाहून तिच्यावरही फिदा झाले आहेत. ट्रेलरमध्ये तृप्तीवर फोकस करण्यात आला आहे. पण चर्चा मात्र बाबिलची होतेय.

बाबिल सोशल मीडियावर बराच अक्टिव्ह आहे. पित्याच्या निधनानंतर तो कायम त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. 1995 मध्ये इरफान व सुतापा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. इरफान व सुतापाला बाबिलशिवाय आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान. अयान सध्या शिकतोय. ‘लाइफ ऑफ पाई’ या सिनेमात अयान आपल्या वडिलांसोबत म्हणजेच इरफानसोबत झळकला होता.

Web Title: Irrfan Khan Son Babil Khan And Tripti Dimri Netflix Movie Qala Official Trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.