हॉलिवूडमध्ये काम करण्याआधी इरफान खानला वाटली होती या गोष्टीची भीती, त्याच्या निधनाने जगभर पसरलीय शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 12:28 IST2020-04-29T12:25:55+5:302020-04-29T12:28:18+5:30

इरफानच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

Irrfan khan dies at 54, he had worked in bollywood and Hollywood movies PSC | हॉलिवूडमध्ये काम करण्याआधी इरफान खानला वाटली होती या गोष्टीची भीती, त्याच्या निधनाने जगभर पसरलीय शोककळा

हॉलिवूडमध्ये काम करण्याआधी इरफान खानला वाटली होती या गोष्टीची भीती, त्याच्या निधनाने जगभर पसरलीय शोककळा

ठळक मुद्देइरफानने या मुलाखतीत सांगितले होते की, मी सुरुवातीला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार केला त्यावेळी तुला केवळ वेटर अथवा ड्रायव्हरच्या भूमिका साकारायला मिळतील असे बॉलिवूडमधील माझ्या अनेक मित्रांचे म्हणणे होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. त्याने पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात इरफान खानने एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यावेळी त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत हॉलिवूडमध्ये काम करण्याच्याआधी त्याच्या मनात काय सुरू होते याविषयी सांगितले होते. 

इरफानने या मुलाखतीत सांगितले होते की, मी सुरुवातीला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार केला त्यावेळी तुला केवळ वेटर अथवा ड्रायव्हरच्या भूमिका साकारायला मिळतील असे बॉलिवूडमधील माझ्या अनेक मित्रांचे म्हणणे होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज आपल्या कलाकारांनादेखील खूप चांगल्या भूमिका मिळत आहेत. माझ्यासोबतच प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण हॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. मला हॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी माझी भूमिका ही मला अतिशय चांगल्याप्रकारे साकारायची केवळ हेच माझ्या डोक्यात होते. पहिल्या भूमिकेमुळे मला भविष्यात आणखी भूमिका मिळाल्या पाहिजेत हा विचार करूनच मी काम केले होते.

Web Title: Irrfan khan dies at 54, he had worked in bollywood and Hollywood movies PSC