"हो मी जाड आहे...", डिप्रेशननंतर स्थूलतेचा सामना करतेय आमिर खानची लेक आयरा; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:39 IST2025-12-29T17:38:04+5:302025-12-29T17:39:15+5:30
आयरा खानने थेट शेअर केला व्हिडीओ, म्हणाली...

"हो मी जाड आहे...", डिप्रेशननंतर स्थूलतेचा सामना करतेय आमिर खानची लेक आयरा; म्हणाली...
आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने बराच काळ डिप्रेशनचा सामना करत होती हे सगळ्यांना माहितच आहे. यासाठी आयरा मानसोपचार तज्ञांकडे जाऊनथेरपीही घेत होती. नंतर आमिर खानही थेरपी घ्यायला लागला होता. आयराला कायम तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं जातं. तिचा नवरा नुपूर शिखरे हा फिटनेस फ्रिक आहे पण आयरा अशी का? असा प्रश्न विचारला जातो. आता तिने बॉडी इमेज आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर भाष्य केलं आहे.
आयरा खानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणते, "हो मी जाड आहे. २०२० पासून मी अनफिट आहे आणि स्थूलतेचा सामना करत आहे. यावरुन मला सतत टोमणे मारले जातात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला अजूनही समजून घेण्याची गरज आहे. मला वाटतं माझ्यात थोडा तरी बदल झाला आहे म्हणूनच आज मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला. कदाचित मी तितकं स्पष्ट बोलू शकणार नाही जितकं मी डिप्रेशनबद्दल बोलले होते. "
ती पुढे म्हणाली, "वाढतं वजन माझ्या प्रत्येक नात्यात, व्यवहारात आणि प्रत्येक गोष्टीच्या मध्ये येत आहे. जितकं मला डिप्रेशनने ग्रासलं होतं तितकाच मला आथा स्थूलतेचा त्रास होत आहे. म्हणूनच आज मला यावर बोलायचं आहे. मी कोणत्या विचारांशी संघर्ष करत आहे यावर मला बोलायचं आहे. यामुळे मला मदत मिळेल अशी आशा आहे. तुम्हालाही यामुळे मदत मिळाली तर चांगलंच होईल. हे पुढे नक्की कसं घडतंय बघुया."
आयरा खानने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. नुपूर आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता. दोघं बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची केमिस्ट्री खूपच क्युट आहे हे त्यांच्या रील्स, व्हिडीओंमधून बघायला मिळतं.