आमिर खानच्या घरी लगीन घाई..! लेक आयरासाठी ज्वेलरी खरेदी करताना दिसला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 19:07 IST2023-12-28T19:06:37+5:302023-12-28T19:07:56+5:30

आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी आयरा खान(Ira Khan)च्या लग्नाच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Marriage Father Aamir Khan Seen Buying Jewellery For Daughter | आमिर खानच्या घरी लगीन घाई..! लेक आयरासाठी ज्वेलरी खरेदी करताना दिसला अभिनेता

आमिर खानच्या घरी लगीन घाई..! लेक आयरासाठी ज्वेलरी खरेदी करताना दिसला अभिनेता

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ची मुलगी आयरा खान(Ira Khan)च्या लग्नाच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. आयरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता(Reena Dutta)ची मुलगी आहे, ती ३ जानेवारीला तिचा प्रियकर नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता अभिनेता आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नाची खरेदी करताना दिसत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नाच्या बंधनात अडकल्याने खान कुटुंबात लग्नाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. अभिनेता आमिर वधूच्या वडिलांची भूमिका साकारण्यात व्यस्त आहे. तो आपली मुलगी आयरा खानच्या लग्नाची खरेदी आणि आयोजन करत आहे.
३ जानेवारीला होणाऱ्या आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. वधूचे वडील आमिर खान लेकीच्या विवाह सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभाग आहे. नुकताच आमिर मुंबईतील एका दुकानात दागिन्यांची खरेदी करताना दिसला. आमिरची माजी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद राव खान देखील प्रत्येक फंक्शनचा भाग होताना दिसत आहेत. वडील म्हणून आमिरसाठी हा महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे.

अलीकडेच आयरा खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या विधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलेले दिसले, जिथे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण दिले जात होते. व्हिडीओमध्ये आमिरची माजी पत्नी किरण राव ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये दिसत होती. आयरा खानची बॉयफ्रेंड नुपूर शिखरे प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही आहे आणि आयरालाही तो फिटनेस ट्रेनिंग देत होता.

Web Title: Ira Khan And Nupur Shikhare Marriage Father Aamir Khan Seen Buying Jewellery For Daughter