कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? IPL मुळे झाली व्हायरल; श्रद्धा कपूरनेही शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 19:33 IST2024-04-13T19:31:26+5:302024-04-13T19:33:33+5:30

पांढऱ्या चिकनकारी कुर्तीमध्ये ही मुलगी खूपच सुंदर दिसत होती.

IPL viral girl look alike Shraddha Kapoor know about Pragati Nagpal internet viral sensation | कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? IPL मुळे झाली व्हायरल; श्रद्धा कपूरनेही शेअर केला फोटो

कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? IPL मुळे झाली व्हायरल; श्रद्धा कपूरनेही शेअर केला फोटो

सध्या आयपीएलचा (IPL) उत्साह सगळीकडे दिसून येतोय. आजकाल मॅच म्हटलं की स्टेडियममध्ये आलेल्या सुंदर मुलींकडे चाहत्यांची नजर जाते. कॅमेरा सतत त्यांच्यावरच फिरतो. अनेक मुली रातोरात इंटरनेट सेन्सेशन होऊन जातात. काल वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्येही अशाच एका मुलीचा फोटो आता व्हायरल होतोय. ही मुलगी अगदी श्रद्धा कपूरसारखी दिसते अशीही चर्चा झाली. खुद्द श्रद्धा कपूरनेही (Shraddha Kapoor) तिच्या सोशल मीडियावर या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

११ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉय चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना झाला. या मॅचदरम्यान एका मिस्ट्री गर्लने आणि तिच्या क्टुट स्माईलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पांढऱ्या चिकनकारी कुर्तीमध्ये ही मुलगी खूपच सुंदर दिसत होती. त्यात तिची स्माईलवर प्रेक्षक फिदाच झाले. अनेकांनी या व्हायरल गर्लची तुलना श्रद्धा कपूरशी केली. 'श्रद्धा कपूरची बहीण' असंही सोशल मीडियावर व्हायरल झालं. मग काय श्रद्धा कपूरने स्वत: इन्स्टाग्राम स्टोरीवर या व्हायरल गर्लचा फोटो शेअर करत गंमतीत लिहिले, 'अरे मीच आहे ही!'

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल आहे प्रगती नागपाल (Pragati Nagpal). तिच्या सोशल मीडियावरुन समजतं की ती प्रोफेशनल गायिका आहे. 4 एप्रिल 2024 रोजी तिचं 'यूजलेस भावरा' हे पहिलं गाणं आलं. तिने दिल्लीच्या विश्व विद्यालय येथे परफॉर्मही केलं आहे. प्रगतीचे इन्स्टाग्रावर 160k फॉलोअर्स आहेत. आता व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये भर पडत आहे.

Web Title: IPL viral girl look alike Shraddha Kapoor know about Pragati Nagpal internet viral sensation