हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:54 IST2025-06-04T11:54:14+5:302025-06-04T11:54:49+5:30

आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे.

ipl final 2025 sunil shetty praised virat kohli after rcb wins shared anushka sharma video | हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ

हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी(३ जून) यंदाच्या आयपीएल हंगामातील शेवटचा फायनल सामना खेळवला गेला. आरसीबी आणि पंजाब किंग्जमध्ये झालेल्या या लढतीत आरसीबीने ६ धावांनी पंजाबचा पराभव करत विजयाचा दुष्काळ संपवला. विशेष म्हणजे, १८ क्रमांकाची जर्सी घालून मिरवणारा किंग कोहलीला १८ व्या हंगामात IPL ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार झालं. 

आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुनील शेट्टीनेविराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. "१८ वर्ष, अगणित धावा, विश्वास आणि शेवटी नियतीवर लाल रंग चढला. विराट कोहली ज्याने आयपीएलला सर्वकाही दिलं, शेवटी त्याने ट्रॉफी उचलली. हा फक्त विजय नाही तर वैभवाने भरलेली प्रेमकथा आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


१८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आरसीबीने ट्रॉफी जिंकत चाहत्यांची मनंही जिंकली. हा विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही जण भावुक झाले. 
 

Web Title: ipl final 2025 sunil shetty praised virat kohli after rcb wins shared anushka sharma video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.