'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:48 AM2024-03-28T11:48:13+5:302024-03-28T11:49:03+5:30

Virat kohli daughter vamika: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एप्रिल २०२३ च्या आयपीएल मॅच दरम्यानचा आहे. मात्र, पुन्हा एकदा हा चिमुकला चर्चेत आला आहे.

ipl-2023-virat-kohli-daughter-vamika-gets-offer-of-dating-from-a-small-fan | 'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

सध्याच्या काळात सेलिब्रिटींपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतात. यात खासकरुन करिना कपूर, रणबीर कपूर,शाहिद कपूर, शिल्पा शेट्टी या बॉलिवूडसेलिब्रिटींची मुलं कायम चर्चेत असतात. मात्र, यावेळी क्रिकेटपटू विराट कोहलीची लाडकी लेक वामिका लाइमलाइटमध्ये आली आहे. एका चिमुकल्याने चक्क वामिकाला डेटवर घेऊन जाण्याची मागणी केली आहे.

विराट आणि अनुष्का यांनी आजपर्यंत वामिकासाठी नो फोटो पॉलिसी जपली आहे. या जोडीने त्यांच्या लेकीचा चेहरा अजूनही चाहत्यांना दाखवलेला नाही. परंतु, तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यामध्येच एका चिमुकल्याचा स्टेडिअममधील फोटो व्हायरल झाला आहे. या लहानग्याने चक्क वामिकाला डेटवर घेऊन जाऊ का? असा प्रश्न विराटला विचारला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका गोड चिमुकल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने हातात एक बोर्ड घेतला असून त्याने, 'हाय विराट काका.. मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?' असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा चिमुकला कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हा फोटो १९ एप्रिल २०२३ च्या आयपीएल मॅच दरम्यानचा आहे. परंतु, सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनुष्का आणि विराट सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळामुळे चर्चेत आहेत. १५ फेब्रुवारीला अनुष्काने अकाय या गोंडस बाळाला जन्म दिला. लंडनमध्ये अकायचा जन्म झाला आहे. अनुष्का सध्या कलाविश्वापासून दूर आहे. तिने २०१८ मध्ये झिरो या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर ती कुठेही फारशी झळकली नाही.

Web Title: ipl-2023-virat-kohli-daughter-vamika-gets-offer-of-dating-from-a-small-fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.