Indian Matchmaking 2: प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:42 IST2022-08-12T12:42:06+5:302022-08-12T12:42:31+5:30

Indian Matchmaking Season 2 : प्रसिद्ध मॅचमेकर सीमा आंटी अर्थात सीमा टपारिया यांना सर्वच ओळखतात. सीमा यांचा ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. कालपासून या शोचा दुसरा सीझन अर्थात ‘इंडियन मॅचमेकिंग 2’  सुरू झाला...

Indian Matchmaking Season 2 sima taparia on priyanka chopra nick jonas match | Indian Matchmaking 2: प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या

Indian Matchmaking 2: प्रियंका चोप्रा व निक जोनासबद्दल हे काय बोलून गेल्या ‘सीमा आंटी’? वाचा, काय म्हणाल्या

प्रसिद्ध मॅचमेकर सीमा आंटी अर्थात सीमा टपारिया (Sima Taparia) यांना सर्वच ओळखतात. सीमा यांचा ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो चांगलाच लोकप्रिय आहे. कालपासून नेटफ्लिक्सवर या शोचा दुसरा सीझन अर्थात ‘इंडियन मॅचमेकिंग 2’ (Indian Matchmaking 2) सुरू झाला. सीमा या शोच्या होस्ट आहेत. त्या लोकांना मॅचमेकिंगसह लाईफ पार्टनरबद्दल टीप्स देतात. पण ‘इंडियन मॅचमेकिंग 2’ ताज्या एपिसोडमध्ये सीमा आंटी असं काही बोलून गेल्या की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, शोच्या ताज्या एपिसोडमध्ये त्या प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) व तिचा पती निक जोनास (Nick Jonas) या कपलबद्दल बोलल्या. त्यामुळे त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

‘इंडियन मॅचमेकिंग 2’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सीमा त्यांच्या क्लाइंट नादियाच्या घरी तिच्या कुटुंबीयांना भेटायला पोहोचतात. येथे नादिया त्यांना विशाल नावाच्या मुलाबद्दल सांगते. मला विशालसोबत आयुष्यात पुढे जायचं आहे, असं नादिया म्हणते. पण यावर, विशाल एक चांगला मुलगा असला तरी तो तुझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, असा सल्ला सीमा आंटी तिला देतात.
यानंतर सीमा आंटी नात्यातील वयाच्या फरकारवर बोलता बोलता प्रियंका व निकबद्दलही बोलतात. त्या प्रियंका व निकचं उदाहरण देतात.

काय म्हणाल्या सीमा
  जर एखादा मुलगा सात वर्षांनी मोठा असेल तर ठीक आहे. परंतु जर मुलगी मुलापेक्षा सात वर्षांनी मोठी असेल तर..? मला माहित नाही... मी कदाचित जुन्या विचारांची असेन. प्रियंका चोप्रा आणि निक या सेलिब्रिटी कपलचं उदाहरण घ्या. त्यांनी लग्न केलंय. मला माफ करा पण मला नाही वाटत त्यांची जोडी शोभून दिसते. कारण तो तिच्यासमोर खूपच लहान दिसतो आणि ती तितकीच मोठी दिसते..., असं सीमा म्हणतात.  
सीमा आंटीच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रियंका व निक यावर काय बोलतात, ते बघूच.
सीमा यांनी ‘इंडियन मॅचमेकिंग 2’ मधून नेटफ्लिक्सवर वापसी केली आहे. या शोचा पहिला सीजन 2020 मध्ये भेटीला आला होता. या शोमध्ये सीमा आपल्या कस्टमर्सना त्यांचा परफेक्ट जोडीदार शोधण्यासाठी मदत करतात. या शोचा दुसरा सीजन 10 आॅगस्टपासून नेटफ्लिक्सवर सुरु झाला आहे.

Web Title: Indian Matchmaking Season 2 sima taparia on priyanka chopra nick jonas match