फॉरेनर दिसतो म्हणून भारतीय प्रेक्षकांनी फिरवली पाठ; शशी कपूर यांचा मुलगा आज जगभरात कमावतोय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:32 PM2023-08-10T17:32:07+5:302023-08-10T17:33:43+5:30

Karan kapoor: करणने श्याम बेनेगल यांच्या 'जुनून' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. पण, काही मोजके सिनेमा केल्यानंतर त्याने इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला.

Indian audience turns away as Foreigner appears; The son of the Kapoor family is making a name for himself in the world today | फॉरेनर दिसतो म्हणून भारतीय प्रेक्षकांनी फिरवली पाठ; शशी कपूर यांचा मुलगा आज जगभरात कमावतोय नाव

फॉरेनर दिसतो म्हणून भारतीय प्रेक्षकांनी फिरवली पाठ; शशी कपूर यांचा मुलगा आज जगभरात कमावतोय नाव

googlenewsNext

जवळपास चार पिढ्यांपासून कलाविश्वावर राज्य करणारं कुटुंब म्हणजे कपूर घराण. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून या घराचा सुरु झालेला फिल्मी प्रवास आजपर्यंत सुरु आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये करिना कपूर (kareena kapoor), रणबीर कपूर (ranbir kapoor) ही नाव लोकप्रिय आहेत. परंतु, त्यांच्या पूर्वी ऋषी कपूर, रणधीर कपूर, शम्मी कपूर या कलाकारांनी बॉलिवूडवर राज्य गाजवलं. विशेष म्हणजे कपूर कुटुंबातील जवळपास सगळेच व्यक्ती लोकप्रिय आणि यशस्वी झाले. मात्र, या कुटुंबात असे दोन व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे पर्सनालिटी, अभिनकौशल्य असूनही त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

शशी कपूर(shashi kapoor) हे नाव आज सगळ्यांनाच परिचित आहे. कलाविश्वात त्यांनी खूप नाव कमावलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने करण कपूर याने ७०-८० चा दशकात बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्याकाळी सर्वात हँडसम अभिनेता म्हणून करण कपूरकडे (karan kapoor)  पाहिलं जायचं. परंतु, त्याचं दिसणंच त्याच्या अपयशाचं कारण ठरलं. त्यामुळेच करण कपूरच्या करिअरविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

शशी कपूर यांनी १९५८ मध्ये जेनिफर केंडल हिच्याशी लग्न केलं. त्यांना कुणाल, करण आणि संजना ही तीन मुलं. परंतु, शशी कपूर यांनी जी लोकप्रियता मिळवली ती त्यांच्या मुलांना मिळवता आली नाही. शशी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांनी बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. मात्र, त्यांचा टिकाव लागला नाही.

करणने श्याम बेनेगल यांच्या 'जुनून' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. पण, काही मोजके सिनेमा केल्यानंतर त्याने इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. करण कपूर बहुतांश त्याच्या आईसारखा दिसायला त्यामुळे तो फॉरेनर वाटायचा. त्याच्या याच रंगरुपामुळे भारतीय सिनेसृष्टीत त्याचा निभाव लागला नाही. लोकांना तो आपलासा वाटत नव्हता. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या सिनेमाकडे पाठ फिरवू लागले. अखेर करण यांनी कलाविश्वातून पाय काढत छायाचित्रांच्या जगात प्रवेश केला. 
आज करण विदेशात फोटोग्राफी करतात. जगात ते प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. करण यांनी मुंबईत टाइम अँड टाइड या नावाने त्याच्या फोटोंचे प्रदर्शन आयोजित केले होते, ज्याची सर्वत्र चर्चा झाली होती.

Web Title: Indian audience turns away as Foreigner appears; The son of the Kapoor family is making a name for himself in the world today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.