भारत-पाकिस्तान सामन्यावर हानिया आमिरची प्रतिक्रिया, म्हणाली "आपण फक्त टॉसच जिंकू शिकतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:52 IST2026-02-16T16:51:55+5:302026-02-16T16:52:22+5:30

India vs Pakistan T20 World Cup 2026 : कालचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये टी-20 सामना रंगला. ...

India vs Pakistan T20 World Cup 2026 Hania Aamir Toss Comment Viral Video | भारत-पाकिस्तान सामन्यावर हानिया आमिरची प्रतिक्रिया, म्हणाली "आपण फक्त टॉसच जिंकू शिकतो"

भारत-पाकिस्तान सामन्यावर हानिया आमिरची प्रतिक्रिया, म्हणाली "आपण फक्त टॉसच जिंकू शिकतो"

India vs Pakistan T20 World Cup 2026 : कालचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये टी-20 सामना रंगला. त्यामुळे सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलं होतं. भारतीय क्रिकेट संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय मैदानातील वर्चस्वही रविवारी कायम राखले. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदांजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचे सर्वच्या सर्व फलंदाज हतबल झालेले पाहायला मिळाले. यातच पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

हानिया आमिरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात ती आपल्या मित्रांसोबत भारत आणि पाकिस्तान सामना पाहताना दिसली. पाकिस्ताननं टॉस जिंकल्यानंतर ती म्हणाली, "आपण फक्त टॉसच जिंकू शकतो". तिची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 


दरम्यान, हानिया आमिर ही पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. भारतात तिची खूप क्रेझ आहे. हानियाचे 'मेरे हमसफर', 'दिल रुबा', 'मुझे प्यार हुआ था', 'इश्किया', 'कभी मैं कभी तुम' या शोला भारतातही प्रचंड पसंती मिळाली आहे. हानियाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न होते. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ याच्या 'सरदारजी ३' मधून ती भारतीय इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार होती.  पण,  पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आणि तिचं ते स्वप्न अपुर्ण राहिलं. 

Web Title : भारत-पाकिस्तान मैच पर हानिया आमिर की प्रतिक्रिया: 'हम सिर्फ टॉस जीतते हैं'

Web Summary : भारत के खिलाफ टॉस जीतने पर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर का वीडियो वायरल हो गया। उसने कहा, "हम सिर्फ टॉस जीतते हैं।" हानिया भारत में अपने लोकप्रिय शो के कारण बड़ी संख्या में प्रशंसक हैं। पाकिस्तानी कलाकारों पर प्रतिबंध के बाद उनका बॉलीवुड डेब्यू रद्द कर दिया गया।

Web Title : Hania Aamir's reaction to India-Pakistan match: 'We only win toss'

Web Summary : Pakistani actress Hania Aamir's video reacting to Pakistan winning the toss against India went viral. She quipped, "We only win the toss." Hania enjoys a large fan following in India due to her popular shows. Her Bollywood debut was cancelled after the ban on Pakistani artists.