दिवंगत अभिनेते इंदर कुमारच्या पत्नीने शाहरुख खान आणि करण जोहरवर लावले गंभीर आरोप, नेपोटिझमचा बळी ठरला इंदर कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:37 IST2020-06-24T11:29:51+5:302020-06-24T11:37:32+5:30
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्द्या चर्चेत आला आहे.

दिवंगत अभिनेते इंदर कुमारच्या पत्नीने शाहरुख खान आणि करण जोहरवर लावले गंभीर आरोप, नेपोटिझमचा बळी ठरला इंदर कुमार
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर प्रत्येकजण हैराण आहे. 34 वर्षांच्या वयात सुशांत जग सोडून निघून गेला आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्द्या चर्चेत आला आहे. नेपोटिझमच्या मुद्द्यामुळे करण जोहर अडचणीत आले आहे.
न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, दिवंगत अभिनेता इंदर कुमार यांची पत्नी पल्लवी यांनी आपला पतीदेखील नेपोटिझमचा बळी ठरले असा खुलासा केला आहे. पल्लवी यांनी शाहरुख खान आणि करण जोहरवर निशाणा साधला आहे. या दोघांनी इंदर यांना कामाचा खोटा दिलासा दिला होता.
रिपोर्टनुसार पल्लवी म्हणाल्या, करण जोहरने त्याला त्याच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर सुमारे २ तास थांबवले आणि नंतर फोन करून सांगितले की सध्या इंदरसाठी त्याच्याकडे काहीच काम नाही आहे. मात्र ते त्याची मॅनेजर गरिमाच्या संपर्कात होते. या भेटीनंतर 15 दिवसांपर्यंत आमचे फोन उचलले गेले त्यानंतर आमचे नंबर ब्लॉक करण्यात आले.
पुढे ते म्हणाल्या, शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसकडून सुद्धा तिची वागणूक इंदर यांनी मिळाली. आम्ही झिरो चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो शाहरुख खानकडून काम मागायला. त्यावेळी तो म्हणाले की, सध्या त्याच्या प्रॉडक्शन हाऊसकडे इंदरला करण्यासारखे कोणतेही काम नाही पण मॅनेजरच्या संपर्कात रहा. त्यानंतर त्याने सुद्धा आमचे फोन उचलणं बंद केले