अटारी बॉर्डरवर टीम शिवायचा ‘स्वातंत्र्यदिन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 14:35 IST2016-08-17T09:05:47+5:302016-08-17T14:35:47+5:30
अजय देवगण हा सध्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा बिगबजेट चित्रपट असून अभिनेत्री सायेशा सेहगल त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार ...

अटारी बॉर्डरवर टीम शिवायचा ‘स्वातंत्र्यदिन’
जय देवगण हा सध्या ‘शिवाय’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा बिगबजेट चित्रपट असून अभिनेत्री सायेशा सेहगल त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले असून काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.
आता ते दोघे चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशनसाठी ते दोघे अटारी बॉर्डरवर गेले. तिथे त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. याठिकाणी गायक सुखविंदर सिंग, मोहित चौहान यांनी देशभक्तीचे वातावरण तयार केले.
अजय देवगणसहित चित्रपटातील टीमने तेथील जवानांशी संवाद साधला. अटारी हे ठिकाण म्हणजे अजयच्या वडीलांचे जन्मस्थान आहे. त्याच्या वडीलांविषयी त्याला विचारले असता, तो यावेळी थोडासा भावनाविवश झाला. ‘शिवाय’ २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.
![ajay devgan]()
![ajay devgan & saisha saigal]()