वाढवलेली दाढी आणि केसांमध्ये काय करतोय ह्रतिक रोशन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 14:55 IST2018-02-06T09:24:19+5:302018-02-06T14:55:59+5:30

चित्रपट 'सुपर ३०' चा हृतिक चा फर्स्ट लूक ह्रतिक रोशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, चित्रपटातील भूमिकेनुसार आपल्या ...

Increased beard and hairs in the hair? | वाढवलेली दाढी आणि केसांमध्ये काय करतोय ह्रतिक रोशन ?

वाढवलेली दाढी आणि केसांमध्ये काय करतोय ह्रतिक रोशन ?

त्रपट 'सुपर ३०' चा हृतिक चा फर्स्ट लूक ह्रतिक रोशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, चित्रपटातील भूमिकेनुसार आपल्या लूकमध्ये बदल करणाऱ्या हृतिकने यावेळेस दाढी वाढवलेली आहेच त्याचबरोबर त्याने केस हे वाढवलेले आहेत. त्याने 'सुपर ३०' चे संस्थापक आनंद कुमार एकेकाळी जसे राहत होते, तसाच लूक हृतिकने केला आहे. त्याने या चित्रपटासाठी केलेला खास लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

हृतिकने  त्याच्या लूकचा फोटो शेअर करताना त्याच्याखाली एक कॅप्शन सुद्धा दिले आहे "आणि प्रवास सुरू झाला." असे लिहिले आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून 'सुपर ३०' हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती पण नंतरच्या २ वर्षातच त्याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली  नंतर या गोष्टी रून प्रेरित होऊन त्यांनी 'सुपर३०' ची सुरवात केली. आनंद कुमार बिहारात सुपर ३०'  नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात.

ALSO READ :  ​हृतिक रोशन त्याच्या मित्राच्या मुलीसोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

या चित्रपटासाठी हृतिक सतत आनंद कुमार यांची भेट घेत आहेत. भेटी दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर दिसत असतात.  हृतिक त्यांच्यासारखे बोलण्यासाठी एका लँग्वेज प्रशिक्षाची मदत घेत आहे काही दिवसांपूर्वी डेक्कन क्रोनिकलने आपल्या वृत्तात सांगितले होते की  आनंद सारखे बोलण्यासाठी हृतिक रोज २ तास  सराव करत आहे आणि हृतिक सारखा आनंद ह्यांच्याशी सवांद साधून त्याची बोलण्याची पद्धत शिकतो असतो आहे.

Web Title: Increased beard and hairs in the hair?