अधुरी एक प्रेमकहाणी..! प्रभू देवा आणि नयनताराचा का तुटलं नातं?, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 19:30 IST2020-05-03T19:30:00+5:302020-05-03T19:30:00+5:30

प्रभू देवा व नयनतारा एकेकाळी लोकप्रिय कपलपैकी एक होते.

An incomplete love story ..! Why did Prabhu Deva and Nayantara break up ?, she herself revealed TJL | अधुरी एक प्रेमकहाणी..! प्रभू देवा आणि नयनताराचा का तुटलं नातं?, खुद्द तिनेच केला खुलासा

अधुरी एक प्रेमकहाणी..! प्रभू देवा आणि नयनताराचा का तुटलं नातं?, खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर व दिग्दर्शक प्रभू देवा आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा एकेकाळचे लोकप्रिय कपल होते. 2009 साली ते दोघे लग्न करणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र 2012 साली त्यांच्या नात्यात कटुता आली आणि ब्रेकअप झाले.

प्रभु देवा आधीच विवाहित होता. त्याच्या पत्नीने 2010 मध्ये फॅमिली कोर्टात प्रभु देवा विरोधात पीटीशन फाईल केली होती. यात नयनतारासोबत लिव इनमध्ये राहणाऱ्या प्रभु देवा विरोधात अ‍ॅक्शन घेण्याबद्दल बोलण्यात आले होते. 2017 साली नयनताराने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, दोघे लग्न करणार होते. मात्र परिस्थिती खूप बदलली होती. 

त्यावेळी नयनतारा म्हणाली होती की, 'बऱ्याच नात्यांमध्ये असे झाले आहे. नात्यात अडचणी येत असतात. जेव्हा हे सगळे कंट्रोलच्या बाहेर जाते तेव्हा मात्र सगळे सांभाळणे कठीण होते. लोक, परिस्थिती किंवा गोष्टी बदलल्यामुळे असे होते. मला खोलात जायचे नाही. माझ्यासाठी हे खूप खासगी आहे. मला हे जगासाठी शेअर करायचे नाही.

पुढे तिने सांगितले की, 'माझ्याबद्दल खूप काही बोलले आणि लिहिले गेले. मी गप्प होते. आता परिस्थिती बदलली आहे. एखादे नाते टिकत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. याची शेकडो कारणे असू शकतात. मला असे वाटते मी जेव्हा नात्यात असते तेव्हा मी 100 % देत असते.

सध्या नयनतारा दिग्दर्शक विघ्नेश सीवन सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

 

 

 

 

Web Title: An incomplete love story ..! Why did Prabhu Deva and Nayantara break up ?, she herself revealed TJL