कंगना राणौतसोबत चित्रपट आणि मग अचानक सोडलं बॉलिवूड, इतक्या वर्षांनंतर इमरान खाननं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:19 PM2024-04-21T16:19:57+5:302024-04-21T16:23:31+5:30

इमराननं बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा खुलासा केला. 

Imran Khan reveals what triggered his sudden decision to quit Bollywood | कंगना राणौतसोबत चित्रपट आणि मग अचानक सोडलं बॉलिवूड, इतक्या वर्षांनंतर इमरान खाननं सांगितलं कारण

कंगना राणौतसोबत चित्रपट आणि मग अचानक सोडलं बॉलिवूड, इतक्या वर्षांनंतर इमरान खाननं सांगितलं कारण

'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री घेत आमिर खानचा भाचा इमरान खानने सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडलं होतं.  गोड, निरागस, गुडबॉय अशी प्रतिमा असलेल्या जय या पात्राने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर 'आय हेट लव स्टोरीज', 'दिल्ली बेली', 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'एक मैं और एक तू' यांसारख्या चित्रपटांमध्ये इमरानने भूमिका साकारली. यानंतर तो शेवटचा अभिनेत्री कंगना रणौतसोबत 'कट्टी बट्टी' सिनेमात झळकला होता. त्यानंतर अचानक त्यानं इंडस्ट्रीचा निरोप घेतला. अशातच आता एका मुलाखतीमध्ये इमरान खाननंबॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा खुलासा केला. 

गेली अनेक वर्ष स्क्रिनपासून दूर असणाऱ्या इमरान खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. पण, त्यानं सिनेसृष्टी अशी अचानक का सोडली, असा प्रश्न लोकांच्या मनात येतो.  नुकत्याच फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या एका मुलाखतीत इमरानने याविषयी सांगितले.  कट्टी बट्टीच्या अपयशामुळे त्यानं बॉलिवूडकडे पाठ फिरवली का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.  यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'हो, त्या क्षणी मी असा विचार केला नाही की आज मी  ही इंडस्ट्री सोडत आहे. एका आठवडा झाला,  एक महिना झाला, मग एक महिन्याचे तीन महिने आणि एक वर्ष झालं, असा काळ बदलत गेला आणि मग मी इंडस्ट्री सोडण्याचं ठरवलं,  कारण माझं मन त्यात नव्हतं'.

चित्रपटांमध्ये काम करणं बंद केल्यानंतर इमरान खान कुटुंबाबरोबरच्या काही फोटोज आणि व्हिडीओजमध्ये दिसला, पण तेवढ्यापुरताच. आता मात्र इमरान  खान कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.  इमरान खानचे  चाहते त्याला चांगलंच मिस करत आहेत. शिवाय इमरान सध्या आपल्या गर्लफ्रेंडमुळेही चर्चेत आहे. 2019 साली पत्नी अवंतिकापासून घटस्फोट घेतल्यानंतर तो लेखा वॉशिंग्टनच्या संपर्कात आला. दोघंही हळूहळू प्रेमात पडले. आता ते आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहे. दरम्यान, इमरानला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Imran Khan reveals what triggered his sudden decision to quit Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.