'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता १० वर्षांनंतर करतोय कमबॅक, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:33 IST2025-11-16T13:32:26+5:302025-11-16T13:33:27+5:30
इमरान खानसोबत या अभिनेत्रीची जमली जोडी

'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता १० वर्षांनंतर करतोय कमबॅक, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार
आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान १० वर्षांनी कमबॅक करत आहे. 'जाने तू या जाने ना' सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. याच सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. नंतर इमरान इतरही काही सिनेमांमध्ये दिसला आणि अचानक एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाला. आता तो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. जुना मित्र दिग्दर्शक दानिश असलमच्या आगामी सिनेमात इमरान खान मुख्य भूमिकेत आहे. तसंच मुख्य अभिनेत्री कोण हेही उलगडलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, "माझा हा सिनेमा ब्रेक के बाद सारखाच आहे. हा सिनेमा दानिश आणि माझ्या आयुष्यातील अनुभवांवर आहे. दानिशचं लग्न झालं आहे तर माझा घटस्फोट झाला आङे. हा एक वैयक्तिक प्रोजेक्ट आहे. मित्रांसोबत मिळून कहाणी सांगायच्या उद्देशाने हा प्रवास सुरु झाला. सिनेमाचं शूट पूर्ण झालं असून आता पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. लवकरच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा होणार आहे.
या सिनेमात इमरान खानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरान म्हणाला,"सर्वांनी मिळूनच भूमीची निवड केली. सेटवर तिच्या असण्याने खूप मजा आली. माझ्यासाठी या सिनेमाचा सेट करिअरमधला सर्वात मजेशीर सेट होता."
इमरान खान २०१५ साली शेवटचा 'कट्टी बट्टी' सिनेमात दिसला होता. यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेतला. मधल्या काळात तो घटस्फोटामुळे चर्चेत होता. तसंच काही काळापासून तो छोट्याशा घरात भाड्याने राहत आहे. इमरान खान आता पुन्हा चंदेरी दुनियेत नशीब आजमावणार आहे.