इमरान हाश्मीचा हुबेहुब कार्बन कॉपी! विश्वास बसत नसेल तर तुम्हीही पाहा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 11:51 IST2018-01-29T06:19:01+5:302018-01-29T11:51:20+5:30
बॉलिवूडचे ‘दिवाने’ केवळ भारतातचं नाहीत तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत. होय, जगभर बॉलिवूडचे ‘दिवाने’ आहेत. आपल्या आवडत्या स्टार्सला कॉपी ...

इमरान हाश्मीचा हुबेहुब कार्बन कॉपी! विश्वास बसत नसेल तर तुम्हीही पाहा!!
ब लिवूडचे ‘दिवाने’ केवळ भारतातचं नाहीत तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत. होय, जगभर बॉलिवूडचे ‘दिवाने’ आहेत. आपल्या आवडत्या स्टार्सला कॉपी करण्यापासून तर त्याची पूजा करण्यापर्यंत सगळे काही हे ‘दिवाने’ करतात. आपल्या भारतात असे कित्येक क्रेझी चाहते भेटतील. भारताच्या शेजारी देशाच्या अर्थात पाकिस्तानातही बॉलिवूडच्या क्रेझी चाहत्यांची संख्या कमी नाही. याच क्रेझी चाहत्यांच्या क्रमात पाकिस्तानचा एक चेहरा चर्चेत आला आहे. होय, बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याच्यासारखा हुबेहुब दिसणारा हा तरूण. या तरूणाचे नाव आहे, मजदाक जान. मजदाक जान हा पाकिस्तानचा तरूण इमरान हाश्मीचा मोठा चाहता आहे. विशेष म्हणजे, तो हुबेहुब इमरानसारखा दिसतो. इमरानची प्रत्येक स्टाईल तो कॉपी करतो.सध्या मजदाकचे इमरान स्टाईलचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
![]()
साभार- @MazdakJanOfficial/Facebook)
मजदाक हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव आहे. अनेकांनी त्याला तो इमरानची कार्बन कॉपी असल्याचे सांगितले आणि हळूहळू मजदाकलाही ते पटले आणि आता? आता तर इमरान आणि मजदाक यांच्यातील फरक ओळखणेही कठीण झालेय. मजदाक आता अॅक्टिंग करू इच्छितो. लवकरच तो मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवणार आहे.
![]()
साभार- @MazdakJanOfficial/Facebook)
![]()
साभार- @MazdakJanOfficial/Facebook)
ALSO READ : का नकोत इमरान हाश्मीला बोल्ड सिनेमे!
अलीकडे एका मुलाखतीत मजदाक यावर बोलला. काहीही न करता केवळ चेह-यामुळे मी फेमस झालोय. लोक माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात, तेव्हा मला आनंद होतो. इमरानचा डुप्लिकेट म्हणून मी स्टार झालोय, असे तो म्हणाला. मजदाक केवळ पाकिस्तानातच लोकप्रीय नाही तर बॉलिवूडवर प्रेम करणाºया भारतासह दुसºया देशांतही त्याची क्रेझ वाढत चालली आहे. आता ही क्रेझ का? हे तुम्हालाही कळेल. मजदाकचे काही फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुम्हीही त्याला ओळखू शकणार नाही. हा मजदाक की इमरान, असा प्रश्न तुम्हालाही पडेल. कदाचित इमरानला स्वत:लाही हा प्रश्न पडेल.