इलूइलू गर्ल मनिषा कोईराला थायलंडमध्ये बीचवर करतेय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:05 IST2016-11-11T17:03:01+5:302016-11-11T17:05:36+5:30
2012 अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाला होता. ट्रीटमेंटसाठी वर्षभर ती अमेरिकेला होती . तब्बल 1 वर्षानंतर मनिषाने कॅन्समधून सावरल्यानंतर ...
.jpg)
इलूइलू गर्ल मनिषा कोईराला थायलंडमध्ये बीचवर करतेय एन्जॉय
2012 अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाला होता. ट्रीटमेंटसाठी वर्षभर ती अमेरिकेला होती . तब्बल 1 वर्षानंतर मनिषाने कॅन्समधून सावरल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही काम करायाला सुरूवात केली.गेल्याच वर्षी तिचा 'ए मॉडर्न डे' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सध्या ती तामिळ आणि तेलगु सिनेमांत काम करत असल्याचेही कळतेय. मनिषा कोईराला सध्या फुल ऑन फन मुडमध्ये दिसतेय. थायलंडला ती सध्या मजा मस्ती करतेय. नुकतेच तिने तिथले बिचवरचे फोटो सोशल साईटसवर शेअर केले आहेत.या फोटोत तिने बिकनी घातल्याचे दिसतेय.'सौदागर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मनिषा आजारपणामुळे लाइमलाईटपासून लांबच होती. मात्त्यार आता ब-याच वर्षानंतर या इलुइलु गर्लचे झलक पाहायला मिळतेय. lतिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कधी तिच्या मित्रांबरोबर रिलॅक्स करतांना दिसतेय, तर कधी योगा करतांना दिसतेय. खुद्द मनिषानेच तिचे हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. सोशल मिडियावर तिचे फोटो येताच मनिषा कोईराला पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
![]()
![]()
![]()
![]()