इलियाना डिक्रुझ झळकणार 'ह्या' अभिनेत्यांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 19:26 IST2019-03-12T19:25:29+5:302019-03-12T19:26:14+5:30

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेता इमरान हाश्मी बर्फ या चित्रपटात एकत्र झळकणार असून आता या चित्रपटात इलियाना डिक्रुझची देखील वर्णी लागली आहे.

Ileana D'Cruz will be seen with 'these' actors | इलियाना डिक्रुझ झळकणार 'ह्या' अभिनेत्यांसोबत

इलियाना डिक्रुझ झळकणार 'ह्या' अभिनेत्यांसोबत

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नुकताच बदला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटानंतर लवकरच ते ब्रम्हास्त्र या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते आणि अभिनेता इमरान हाश्मी बर्फ या चित्रपटात काम करताना दिसणार असल्याचे समजले होते. या चित्रपटात आता अभिनेत्री इलियाना डिक्रुझची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे.

पिपींगमूनच्या रिपोर्टनुसार, इलियाना डिक्रूझ अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत झळकत असून या सिनेमाचे नाव ‘बर्फ: एक खेल’ असे आहे. हा एक कोर्टरुम ड्रामा आहे. इलियाना चित्रपटात चीट करणाऱ्या पत्नीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

२००८ साली प्रदर्शित झालेल्या गॉड तुस्सी ग्रेट हो या सिनेमाच्या दिग्दर्शनातून रुमी जाफरी यांनी बॉलिवूड पदार्पण केले होते.

अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी व इलियाना डिक्रुझ यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Ileana D'Cruz will be seen with 'these' actors