व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:17 IST2019-07-27T14:13:04+5:302019-07-27T14:17:24+5:30

मुंबईत इलियाना ब-याचदा अँड्रयूसह फिरतानाही दिसते. मात्र आजपर्यत इलियानाने तिच्या या प्रेमाविषयी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

ileana Dcruz Shares Throwback Photo In White Bikini | व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच

व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच

रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या सिनेमातून गायब असली तरी तिने  पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला खास कारण म्हणजे तिचे हे ग्लॅमरस फोटो. शेअर केलेल्या फोटोत इलियाना व्हाईट बिकीनीत दिसत असून मिनिमल मेकअप तिने केला आहे. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसत असून ग्लॅमरस अंदाज तिचा पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने 'Throwback on a Friday' असे कॅप्शन दिले आहे.

इलियाना लवकरच अनीस बाज्मीच्या 'पागलपंती' सिनेमात झळकणार आहे.  या सिनेमात इलियाना व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला आणि अरशद वारसी यांच्या भूमिका आहेत. सध्या सिनेमाचे काही भागाचे शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे.   नोव्हेंबर  2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचे प्लॅनिंग आहेत. इलियाना मध्यंतरी तिच्या अफेअरमुळेही चर्चेत होती. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू निबोनसह असलेल्या अफेअरमुळे तिने खूप पब्लिसिटीही मिळवली.

 

तिने एक फोटो शेअर करत  हबी म्हणजेच हसबंड असल्याचे नमूद केले होते. इलियानाच्या या पोस्टनंतर इलियानाने अँड्रयूशी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर  दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नव्हते. तसेच मुंबईत इलियाना ब-याचदा  अँड्रयूसह फिरतानाही दिसते. मात्र आजपर्यत इलियानाने तिच्या या प्रेमाविषयी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. 

तसेच इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराचा सामना करते आहे. ती बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने पीडित आहे. या आजारात शरीराचा शेप बिघडतो. ज्यामुळे शरीराचा आकार वेगळा दिसायला लागतो. इलियानाच्या कमरेखालचे शरीर थोडे मोठे आहे. ती ते सैल कपड्यांमध्ये लपवते. या आजारामुळेच ती नैराश्यात गेली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. 

Web Title: ileana Dcruz Shares Throwback Photo In White Bikini