हिच्यापुढे सगळ्याच फेल...! ब्लॅक बिकिनीत क्रूजवर केले बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 14:07 IST2020-01-31T14:05:26+5:302020-01-31T14:07:42+5:30

अलीकडे रुपेरी पडद्यावर तिचे फारसे दर्शन होत नसले तरी सोशल मीडियावरच्या हॉट फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते.

ileana dcruz bikini photos viral actress says need some vitamin sea | हिच्यापुढे सगळ्याच फेल...! ब्लॅक बिकिनीत क्रूजवर केले बोल्ड फोटोशूट

हिच्यापुढे सगळ्याच फेल...! ब्लॅक बिकिनीत क्रूजवर केले बोल्ड फोटोशूट

ठळक मुद्देनुकतीच इलियाना जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या सिनेमात दिसली होती.

अलीकडे रुपेरी पडद्यावर तिचे फारसे दर्शन होत नसले तरी सोशल मीडियावरच्या हॉट फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते.  मादक अदांनी चाहत्यांना रिझवणा-या या अभिनेत्रीपुढे बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा फ्लॉप आहेत. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे तुमच्या लक्षात आले असेलच. होय, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल इलियाना डिक्रूज हिच्याबद्दल. इलियाना डिक्रूझ नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचे लाखोंच्या संख्येने फॉलोव्हर्स आहेत. रुस्तम, रेड, बर्फी आणि  बादशाहो  यासारख्या सिनेमात काम केलेली  इलियान सध्या सिनेमातून गायब आहे. पण तिच्या फोटोंची मात्र जोरदार चर्चा आहे.

या फोटोत इलियाना क्रूजवर आहे. ब्लॅक बिकिनीत तिने पोज दिली आहे. Need me some vitamin sea, असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे. इलियानाच्या या ब्लॅक बिकिनीतील फोटोला काहीच तासांत पाच लाखांवर लाईक्स मिळालेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून इलियाना ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती. तिने गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती. इतकेच नाही तर इलियाना प्रेग्नेंट असल्याचीही चर्चा रंगली होती. पण या सगळ्या चर्चा ख-या सिद्ध होण्याआधीच इलियाना आणि अँड्रयूचे ब्रेकअप झाले.

ब्रेकअपनंतर सिंगल झालेली इलियाना सध्या सुट्टी एन्जॉय करतेय. यादरम्यानच्या तिच्या काही हॉट फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय.


 
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच इलियाना जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या सिनेमात दिसली होती. या मल्टिस्टारर चित्रपटाकडून इलियानाला बºयाच अपेक्षा होत्या.  हा सिनेमा दणकून आपटला आणि इलियानाचा अपेक्षाभंग झाला. 

Web Title: ileana dcruz bikini photos viral actress says need some vitamin sea