90च्या दशकातील मिलिंद सोमणचा फोटो पाहून पडाल त्याच्या प्रेमात, पहा त्याचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 13:56 IST2020-05-04T13:56:01+5:302020-05-04T13:56:53+5:30

मिलिंद सोमण याने त्याच्या तारूण्यातील फोटो शेअर केला आहे.

If you fall in love with a photo of Milind Soman in the 90's, look at his photo tjl | 90च्या दशकातील मिलिंद सोमणचा फोटो पाहून पडाल त्याच्या प्रेमात, पहा त्याचा फोटो

90च्या दशकातील मिलिंद सोमणचा फोटो पाहून पडाल त्याच्या प्रेमात, पहा त्याचा फोटो

सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता व आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याशिवाय तो त्याची पत्नी अंकीता कुंवरसोबतच्या फोटोंमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच तरूण दिसतो. 


नुकताच मिलिंद सोमण याने त्याच्या तारूण्यातील फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो 1990 सालातील आहे.


मिलिंद सोमणच्या या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.


मिलिंद सोमण नुकताच फोर मोअर शॉर्ट प्लीझ या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाला. यात त्याने इंटिमेट सीन दिले आहेत. यामुळे तो चर्चेतदेखील आला होता.


पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमणने सांगितले की, 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमधील माझे इंटिमेट सीन पाहून ती एकदम कुल होती. पण जेव्हा मला पहिला सीझन मिळाला होता तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि त्यात इंटिमेट सीन होते. टेबलावर अंडरवेअरमध्ये एक चालतानाचा सीनही होता. हे ऐकून अंकिता म्हणाली की हे अगदी मजेशीर असेल. वास्तविक ती यासाठी खूप उत्साही होती.'


पुढे मिलिंद म्हणाला की, 'लग्नाआधी मी माझी सर्व कामं कोणालाही न विचारता आपल्या मर्जीने करीत होतो. पण अंकिताशी लग्न झाल्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करतो. हा माझ्यामधील एक मोठा बदल आहे, आता फक्त मीच नाही, कोणीतरी आहे जो खूप महत्त्वाचा आहे.'

नुकतेच मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांच्या लग्नाला दोन वर्षे पुर्ण झाली. त्यांनी लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या लग्नांच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: If you fall in love with a photo of Milind Soman in the 90's, look at his photo tjl