ऐश्वर्या राय बच्चनचे फॅन असाल तर ही बातमी वाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 12:42 IST2017-12-26T07:12:53+5:302017-12-26T12:42:53+5:30

ऐश्वर्या राय बच्चनच्या फॅन्सनी नुकताच तिचा अभिनय ऐ दिल है मुश्किल आणि सरबजीत सारख्या चित्रपटांमध्ये बघितला आहे. ऐश्वर्या नुकतेच ...

If you are a fan of Aishwarya Rai Bachchan, read this news! | ऐश्वर्या राय बच्चनचे फॅन असाल तर ही बातमी वाचा !

ऐश्वर्या राय बच्चनचे फॅन असाल तर ही बातमी वाचा !

्वर्या राय बच्चनच्या फॅन्सनी नुकताच तिचा अभिनय ऐ दिल है मुश्किल आणि सरबजीत सारख्या चित्रपटांमध्ये बघितला आहे. ऐश्वर्या नुकतेच राकेश ओम प्रकाश मेहराच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर ती रात और दिन सारख्या जबरदस्त चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करताना दिसणार आहे. 

रात और दिन बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. नरगिस यांचा हा चित्रपट होता. या चित्रपटासाठी नरगिस यांना नॅशनल अॅवॉर्डनेसुद्धा सम्मानित करण्यात आले होते. चित्रपटात कथा एका अशा महिले भवती फिरते जिला मल्टी पर्सनॉलिटी डिसऑर्डरचा आजार असतो.  

या चित्रपटाबाबत बोलताना निर्मिती प्रेरणा अरोरा म्हणाली की, आम्ही या चित्रपटावर काम करतो आहे. सिद्धार्थ आणि मी दोघे मिळून हा चित्रपट तयार करतो आहे. या चित्रपटाबाबत मी संजय दत्तशी बोलले आहे. माझी इच्छा आहे या चित्रपटात त्यांने काम करावे. अजून ऐश्वर्याने या चित्रपटासाठी होकार नाही दिला. 
काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती का हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांची जोडी या चित्रपटाची निर्मिती करणार होते. मात्र तो चित्रपट का बनू शकला नाही या मागचे कारण समजू शकलेले नाही. आता आशा आहे की प्रेरणा लवकरात लवकर या चित्रपटाचे काम सुरु करेल.  

ALSO READ  :  SEE PICS : ​एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!
 
लवकरच ऐश्वर्याचा फन्ने खां हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. 

Web Title: If you are a fan of Aishwarya Rai Bachchan, read this news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.