हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 12:22 IST2018-07-21T12:09:41+5:302018-07-21T12:22:55+5:30

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय.  श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना.

If dare then see the movie, guess who she in horrible look? | हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण?

हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण?

ठळक मुद्दे'स्त्री' हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे31 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय.  श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना. कंज्यरिंग सिरीजचा आगामी सिनेमा 'द नन' रिलीज होणार आहे, या सिनेमातली अभिनेत्रीसुद्धा अशाच अंदाजात ननचा ड्रेस घालून दिसतेय.   
तुम्हाला श्रद्धाचा लूकवरुन हा सिनेमा हॉरर असल्याचे वाटले असेल मात्र हा सिनेमा फक्त हॉरर नाही तर हॉरर-कॉमेडी आहे. या सिनेमाचा टीझर याआधीच रिलीज झाला आहे. टीझरमध्ये देखील त्यांनी हॉरर सीन दाखवले होते. श्रद्धा यात भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडिताच्या असे अंदाज टीझर बघून लावण्यात येतोय.   
सिनेमाटे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत तर सिनेमाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. सिनेमाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.  


श्रद्धा 'स्त्री'शिवाय सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे तसेच ती 'बत्ती गुल मीटर चालू' आणि 'साहो'मध्ये सुद्धा झळकणार आहे. तर राजकुमार रावबाबत बोलयाचे झाले तर  'क्वीन'नंतर पुन्हा एकदा कंगना राणौत स्क्रिन शेअर करतोय. सध्या तो 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: If dare then see the movie, guess who she in horrible look?