पलक तिवारीने 'छोटे नवाब'सोबत केलं नववर्षाचं स्वागत, चेहरा लपवताना दिसले स्टारकिड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:03 AM2024-01-01T10:03:37+5:302024-01-01T10:04:36+5:30

इब्राहिम अली खान त्याच्या गुड लुक्समुळे कायम चर्चेत असतो.

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari celebrated new year together both hid faces while walking out | पलक तिवारीने 'छोटे नवाब'सोबत केलं नववर्षाचं स्वागत, चेहरा लपवताना दिसले स्टारकिड्स

पलक तिवारीने 'छोटे नवाब'सोबत केलं नववर्षाचं स्वागत, चेहरा लपवताना दिसले स्टारकिड्स

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारीने (Palak Tiwari) गेल्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मध्ये तिने भूमिका साकारली. पलक तिवारी आणखी एका गोष्टीमुळे कायम चर्चेत असते. सैफ अली खानचा मुलगा छोटा नवाब इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) तिच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी काल रात्री उशिरापर्यंत न्यू इयर सेलिब्रेशन केले. नंतर दोघंही चेहरा लपवत बाहेर पडताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इब्राहिम अली खान त्याच्या गुड लुक्समुळे कायम चर्चेत असतो. पतौडी परिवाराची झलक त्याच्यात दिसते. तरुणपणी सैफ अली खान जसा दिसायचा तसाच आता इब्राहिम दिसतो. या नवीन वर्षात इब्राहिम बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे. अभिनेत्री पलक तिवारीसोबत तो अनेक पार्टी, इव्हेंट्समध्ये दिसला आहे. या कथित कपलने नुकतंच एकत्रित न्यू इयर सेलिब्रेशन केले. नवीन वर्षाचं जोरदार स्वागत केल्यानंतर दोघंही एकाच कारमधून रवाना झाले. तेव्हा पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघंही चेहरा लपवताना दिसले.

इब्राहिम आणि पलकच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा ट्रोल केले आहे. 'आता चेहरा लपवून काय फायदा','चेहरा लपवायचाच असतो तर सोबत येता कशाला' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर एकाने श्वेता तिवारीला टॅग करत लिहिले,'बघा तुमची मुलगी काय करत आहे'.

इब्राहिम अली खानने गेल्या वर्षी आलेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. तर पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये नशीब आजमवताना दिसत आहे. इब्राहिम 2024 या वर्षात सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.

Web Title: Ibrahim Ali Khan and Palak Tiwari celebrated new year together both hid faces while walking out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.