पापा सैफ अली खानने सुरु केली लेकाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 13:26 IST2019-04-01T13:26:23+5:302019-04-01T13:26:45+5:30

साराचे करिअर मार्गी लागले आणि सैफ व अमृता निश्चिंत झालेत. पण मुलीच्या करिअरची चिंता संपली असली तरी मुलाच्या करिअरची चिंता मात्र अद्यापही बाकी आहे.

ibrahim ali khan all set for bollywood after sara ali khan | पापा सैफ अली खानने सुरु केली लेकाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी!!

पापा सैफ अली खानने सुरु केली लेकाच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी!!

ठळक मुद्देइब्राहिम सध्या केवळ १७ वर्षांचा आहे. वयाच्या ७ व्या वर्षी ‘टशन’ या चित्रपटात इब्राहिमने एक लहानशी भूमिका साकारली होती.

सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने गतवर्षी बॉंलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोनच चित्रपटांनंतर साराने बॉलिवूडमधील आपले स्थान पक्के केले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर साराचे करिअर मार्गी लागले आणि सैफ व अमृता निश्चिंत झालेत. अर्थात मुलीच्या करिअरची चिंता संपली असली तरी मुलाच्या करिअरची चिंता मात्र अद्यापही बाकी आहे. पण आता सैफचा मुलगा इब्राहिम हाही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाला आहे.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, इब्राहिमही बहीण साराप्रमाणे बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छितो. त्यामुळे आता सैफने इब्राहिमला लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, सैफ इब्राहिमसाठी एक चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. अद्याप या चित्रपटाबद्दलचा तपशील कळू शकला नाही. पण इब्राहिमला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा पापा सैफचा इरादा मात्र पक्का असल्याचे कळतेय.


साराने बॉलिवूडमध्ये यावे अशी सैफची इच्छा नव्हती. पण साराने फिल्मी करिअर निवडले. सैफनेही तिच्या निर्णयाचा आदर केला. आता सैफने मुलाचा निर्णयही मान्य केला आहे. फक्त सारा इतकाच इब्राहिम यशस्वी ठरतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


इब्राहिम सध्या केवळ १७ वर्षांचा आहे. वयाच्या ७ व्या वर्षी ‘टशन’ या चित्रपटात इब्राहिमने एक लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, अनिल कपूर व सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. इब्राहिमला अ‍ॅक्टिंगशिवाय क्रिकेटमध्येही रस आहे.

Web Title: ibrahim ali khan all set for bollywood after sara ali khan