विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:03 PM2023-04-15T16:03:23+5:302023-04-15T16:07:58+5:30

या चित्रपटाच्या निमित्ताने विद्युत जामवाल निर्मिती श्रेत्रात पदार्पण करतोय.

ib 71 teaser out the teaser of vidyut jammwal anupam kher starrer action thriller ib 70 released | विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज

विद्युत जामवालच्या अ‍ॅक्शन-थ्रिलर IB 70 चा टीझर समोर, या तारखेला होणार रिलीज

googlenewsNext

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले पण काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. विद्युत अ‍ॅक्शन चित्रपट जास्त करत असला तरी त्याचे चाहतेही त्याला तसे पसंत करतात. पण यावेळी तो निर्माता म्हणून येत आहे. विद्युत जामवालचा पुढील चित्रपट 'IB71' 12 मे रोजी मोठ्या रिलीजसाठी सज्ज आहे. 

तो लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकल्प रेड्डी दिग्दर्शित 'IB 71' चित्रपटासह पडद्यावर दिसण्याची तयारी करत आहे. अलीकडेच बहुप्रतिक्षित स्पाय थ्रिलरची घोषणा करताना, त्याने पोस्टर आणि टीझरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अनुपम खेर विद्युत जामवालसोबत सीक्रेट मोहिम आखताना दिसत आहेत. या अभिनेत्याला विचारले जाते की पाकिस्तान इतका मूर्ख आहे का की ते हे मिशन अयशस्वी करू शकणार नाही. प्रत्युत्तरात, विद्युत त्याला सांगतो की "त्याचे ध्येय कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होईल."

'IB 71' भारतीय गुप्तचर संस्था आणि पाकिस्तानी एजन्सी यांच्यातील दोन आघाडीच्या युद्धाभोवती फिरते. संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात अश्वथ भटही दिसणार आहे. ज्याने हैदर, राझी आणि लम्हा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मीर सारख्या चित्रपटात काम केले आहे.
 

Web Title: ib 71 teaser out the teaser of vidyut jammwal anupam kher starrer action thriller ib 70 released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.