काय सांगता कार्तिक आर्यनच्या शोमध्ये येणार तो IAS ऑफिसर, ज्याला घाबरतो कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:20 IST2020-05-12T17:19:26+5:302020-05-12T17:20:27+5:30

या IAS ऑफिसरला मॅन विथ अ गिफ्ट ऑफ इंस्टंट डिसिजन असे संबोधले जाते.

The IAS officer, who is feared by Corona, will appear in Karthik Aryan's show TJL | काय सांगता कार्तिक आर्यनच्या शोमध्ये येणार तो IAS ऑफिसर, ज्याला घाबरतो कोरोना

काय सांगता कार्तिक आर्यनच्या शोमध्ये येणार तो IAS ऑफिसर, ज्याला घाबरतो कोरोना

कार्तिक आर्यन लॉकडाउनमध्येदेखील कामात व्यस्त आहे. त्याचा युट्यूबवरील शो कोकी पुछेगा खूप लोकप्रिय ठरत आहे. या शोमधून तो कोरोना व्हायरसशी संदर्भात जनजागृती करतो आहे. आज तो कोकी पुछेगाचा नवा एपिसोड लाँच करणार आहे. या भागात केरळचे सुपरहिरो आयएएस जिल्हा कलेक्टर नूह बावा यांची कार्तिक मुलाखत घेताना दिसणार आहे.


नूह बावा यांना मॅन विथ ए गिफ्ट ऑफ इंस्टंट डिसिजन असे संबोधले जात आहे. यामागे कारण आहे बावा यांचे काम. जिल्ह्याचे कलेक्टर असलेले नूर बावा यांनी त्यांच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर तेव्हाच रोख लावायला सुरूवात केली होती जेव्हा त्यांच्या इथे तीन केस समोर आले होते. कार्तिकने त्याच्या कोकी पुछेगा या शोमध्ये त्यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगत इंस्टाग्रामवर लिहिले की, नूह बावा, द आयएएस ऑफिसर ज्यांना कोरोनाही घाबरतो. कोकी पुछेगा या सीरिजचा हा पाचवा एपिसोड आहे.


अभिनेता कार्तिक आर्यनच्या कोकी पुछेगा या शोला खूप लोकप्रियता मिळत आहे.

पहिल्या भागात त्याने कोराना मुक्त झालेल्या सुमिती सिंग यांच्यासोबत चर्चा केली होती. दुसऱ्या भागात गुजरातमधील एक डॉक्टर मीमांसा बुच यांची मुलाखत घेतली होती. तिसऱ्या भागात मध्य प्रदेशचे पोलीस मधुरवीना आणि चौथ्या भागात प्रसिद्ध फिटनेस आणि लाइफस्टाईल प्रशिक्षक ल्यूक कॉउटिन्होशी बोलताना दिसला होता.

Web Title: The IAS officer, who is feared by Corona, will appear in Karthik Aryan's show TJL