राजकुमार राव म्हणतो, केवळ पैसा कमवण्यासाठी मी अभिनेता बनलो नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 12:09 IST2019-01-07T12:08:42+5:302019-01-07T12:09:03+5:30

राजकुमारने आपल्या मानधनात वाढ केली आणि नेमक्या याच कारणाने करण जोहरसारख्या काही बड्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी नाके मुरडली. ताज्या मुलाखतीत राजकुमारला नेमक्या या मुद्यावर छेडण्यात आले. तू तुझ्या मानधनात वाढ केलीय, हे खरे आहे का? असा थेट प्रश्न त्याला केला गेला

I never wanted to be an actor to earn lot of money – Rajkummar Rao | राजकुमार राव म्हणतो, केवळ पैसा कमवण्यासाठी मी अभिनेता बनलो नाही!

राजकुमार राव म्हणतो, केवळ पैसा कमवण्यासाठी मी अभिनेता बनलो नाही!

ठळक मुद्दे  ‘लव्ह, सेक्स और धोखा’ हा राजकुमारचा पहिला चित्रपट. पहिल्या चित्रपटातील राजकुमारच्या कामाचे अमाप कौतुक झाले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून बघितले नाही. कदाचित अनेकांच्या नजरेतून सुटले असेल पण ‘गँग आॅफ वासेपूर’मध्ये राजकुमार कॅमिओ रोलमध्ये दिसला होता

बॉलिवूडचे गतवर्ष ख-या अर्थाने अभिनेता राजकुमार रावच्या नावे राहिले. राजकुमारच्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आणि राजकुमार एकदम बॉलिवूडच्या ‘ए लिस्ट अ‍ॅक्टर्स’च्या यादीत पोहोचला. गतवर्षाच्या सुरुवातीला आलेला त्याचा ‘ओमेर्टा’ हा चित्रपटही गाजला. यातील राजकुमारच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. साहजिकचं या सगळ्यांच्या परिणाम राजकुमारच्या मानधनावर झाला. राजकुमारने आपल्या मानधनात वाढ केली आणि नेमक्या याच कारणाने करण जोहरसारख्या काही बड्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी नाके मुरडली. एक दोन चित्रपट हिट झालेत की, नव्या पिढीच्या कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. त्यांची फी अव्वाच्या सव्वा वाढते, असे करण जोहर म्हणाला. यावेळी त्याने विकी कौशल, राजकुमार राव अशा काही अभिनेत्यांची नावेही घेतली. 


ताज्या मुलाखतीत राजकुमारला नेमक्या या मुद्यावर छेडण्यात आले. तू तुझ्या मानधनात वाढ केलीय, हे खरे आहे का? असा थेट प्रश्न त्याला केला गेला. या प्रश्नावर राजकुमार आधी तर हसला आणि मग त्याने उत्तर दिले. मी पैसे कमवण्यासाठी अभिनेता बनलेलो नाही. मी माझ्या कामावर प्रचंड प्रेम करतो आणि म्हणून पैसा माझ्यासाठी गौण आहे. माझा आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी माझी स्वत:ची टीम आहे. चित्रपटासाठी मी पैसे घेतोच. पण केवळ पैशांसाठी मी एखादा चित्रपट नाकारला किंवा सोडला, असे कधीच झाले नाही, असे राजकुमार म्हणाला.


येत्या वर्षांत राजकुमारचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘मेंटल है क्या’, ‘मेड इन चायना’, ‘तुर्रम खान’ असे अनेक चित्रपट आहेत. अनुराग बासूच्या एका चित्रपटातही तो दिसणार आहे. 

 ‘लव्ह, सेक्स और धोखा’ हा राजकुमारचा पहिला चित्रपट. पहिल्या चित्रपटातील राजकुमारच्या कामाचे अमाप कौतुक झाले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून बघितले नाही. कदाचित अनेकांच्या नजरेतून सुटले असेल पण ‘गँग आॅफ वासेपूर’मध्ये राजकुमार कॅमिओ रोलमध्ये दिसला होता.

Web Title: I never wanted to be an actor to earn lot of money – Rajkummar Rao