आईकडून कॅटला मिळाले ‘हे’ ख्रिसमस गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 17:29 IST2016-12-30T17:16:13+5:302016-12-30T17:29:38+5:30

सण जवळ आला की, प्रत्येकाला उत्सुकता असते ती जवळच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या गिफ्टची.. ‘बी टाऊन’चे कलाकारही याला अपवाद नाहीत. कॅटरिना कैफला ...

I get a cat from 'I' Christmas Gift! | आईकडून कॅटला मिळाले ‘हे’ ख्रिसमस गिफ्ट!

आईकडून कॅटला मिळाले ‘हे’ ख्रिसमस गिफ्ट!

जवळ आला की, प्रत्येकाला उत्सुकता असते ती जवळच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या गिफ्टची.. ‘बी टाऊन’चे कलाकारही याला अपवाद नाहीत. कॅटरिना कैफला हिलादेखील  ख्रिसमसच्या पूर्वी अशीच उत्सुकता लागली होती. कॅटरिनाने यंदाचा नाताळ तिच्या कुटुंबियांसोबत लंडनमध्ये सेलिब्रेट केला. यावेळी कॅटला तिच्या आईकडून स्वत: लोकरीने विणलेला स्कार्फ गिफ्ट मिळाला. हा स्कार्फ गळ्यात बांधलेला फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. फोटोंच्या कोलाजमध्ये तिने पिवळ्या रंगाचा स्कार्फ बांधलेला दिसतो आहे.

                                                   

जवळच्या व्यक्तीकडून मिळालेले गिफ्ट म्हणजे एक अमूल्य ठेवा असतो. कॅटरिनासाठी देखील आईने दिलेला हा लोकरीचा स्कार्फ  असाचा अमूल्य ठेवा आहे.  ती सांगते, ‘आई मला नाताळचे काय गिफ्ट देणार? हे जाणून घ्यायला मी प्रचंड उत्सूक होते. तिने मला स्वत:च्या हाताने विणलेला लोकरीचा स्कार्फ भेट म्हणून दिला. हा स्कार्फ माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. अजूनही लोक लोकरीच्या वस्तू विणतात याचे मला आश्चर्य वाटतेय’ असेही ती म्हणाली.

कॅटरिना कैफ ही सध्या ‘जग्गा जासूस’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. जग्गा जासूसचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. ट्रेलरला युट्यूबवर अनेक लाईक्स मिळाले आहेत. तर टायगर जिंदा है या चित्रपटासाठी तिने विशेष ट्रेनिंग घेतल्याचे कळतेय. पाहूयात, जग्गा जासूस आणि टायगर जिंदा हैं या बिगबजेट चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय ते..

Web Title: I get a cat from 'I' Christmas Gift!