‘पत्नीशिवाय मी जात नाही शॉपिंगला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 11:19 IST2016-08-22T05:49:13+5:302016-08-22T11:19:13+5:30

 फवाद खान सध्या करिअरच्या बाबतीत यशाच्या शिखरावर आहे. तो लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात दिसणार ...

'I do not go shopping without wife' | ‘पत्नीशिवाय मी जात नाही शॉपिंगला’

‘पत्नीशिवाय मी जात नाही शॉपिंगला’

 
वाद खान सध्या करिअरच्या बाबतीत यशाच्या शिखरावर आहे. तो लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात दिसणार आहे. करिअरशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना तो म्हणतो,‘ मी माझ्या पत्नीशिवाय शॉपिंगला जाऊ शकत नाही. माझी पत्नी सदाफ आणि मुलगा अयान हे माझे खुप चांगले मित्र आहेत.

मला या दोघांसोबत मनसोक्त फिरायला फार आवडते. शॉपिंगला मी फार कमी जातो. आणि मला फारसं काही कळत नाही शॉपिंगमधलं. मला याबाबतीत पत्नीचे मत महत्त्वाचे वाटते. तिला मी जी वस्तू घेतली आहे ती आवडेल की नाही ? असे वाटते. त्यामुळे तिचे डिपार्टमेंट मी तिलाच सांभाळायला लावतो.’ फवादने याअगोदर ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ मध्ये आलिया, सिद्धार्थ यांच्यासोबत काम केले होते. 

fawad khan & family

Web Title: 'I do not go shopping without wife'