मुलांच्या बाबतीत मी खूप सेंसिटिव्ह!- शाहिद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:51 IST2019-01-20T18:49:15+5:302019-01-20T18:51:11+5:30

मुलांच्या बाबतीत आपली आणि पत्नी मीरा राजपूतची भूमिका वेगवेगळी असल्याचे शाहिद कपूरने सांगतो. दोन्ही मुलांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीरा त्याला शांत राहण्याचा सल्ला देते तर त्याला वाटते की मीरा खूप कॅज्युअल आहे.

 I am very sensitive to children! - Shahid | मुलांच्या बाबतीत मी खूप सेंसिटिव्ह!- शाहिद

मुलांच्या बाबतीत मी खूप सेंसिटिव्ह!- शाहिद

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची जोडी सर्वांत रोमँटिक जोड्यांपैकी एक  आहे. ते दोघेही दोन मुलांचे पालक असून त्यांच्या मुलांच्या बाबतीत खूपच सेंसिटिव्ह असल्याचे सांगताता. मुलांच्या बाबतीत आपली आणि पत्नी मीरा राजपूतची भूमिका वेगवेगळी असल्याचे शाहिद कपूरने सांगतो. दोन्ही मुलांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीरा त्याला शांत राहण्याचा सल्ला देते तर त्याला वाटते की मीरा खूप कॅज्युअल आहे.

अलिकडेच पार पडलेल्या एका सोहळयात शाहिदने वैवाहिक आयुष्य, पॅरेंटिंग आणि आपल्या फिल्मी करियरबद्दल मोकळेपणाने बातचीत केली.  यावेळी शाहिद म्हणाला, ‘माझी पत्नी मला म्हणते की, मुलांच्या बाबतीत मी फारच संरक्षणात्मक आहे आणि ती मला शांत राहण्याचा सल्ला देते. मी सांगितले की, ती फारच कॅज्युअल आहे. यानंतरही आम्ही यातून मुलांसाठी योग्य असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला दोन्ही प्रकराच्या पालकांची गरज असते. दोघेही आपुलकीने वागले किंवा दोघेही गैरसोयीने वागले तर ते अयोग्य ठरेल. या करीता आपल्याला संतुलन राखले पाहिजे.’ शाहिद आणि मीरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. त्यांना मीशा ही मुलगी आणि जायन नावाचा मुलगा आहे.

Web Title:  I am very sensitive to children! - Shahid