‘१३व्या वर्षापासून मी नैराश्यात जगतेय’, शाहिन भट्टचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:06 IST2016-11-24T18:57:46+5:302016-11-24T19:06:25+5:30

आता आलियाची बहीण शाहीन भट्ट तिच्या नैराश्यातील दिवसांबद्दल काही सांगू इच्छिते. तिने यासंबंधी इन्स्टाग्रामवर एक संवेदनशील संदेश चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

'I am frustrating from the 13th year', Shahin Bhatt reveals | ‘१३व्या वर्षापासून मी नैराश्यात जगतेय’, शाहिन भट्टचा खुलासा

‘१३व्या वर्षापासून मी नैराश्यात जगतेय’, शाहिन भट्टचा खुलासा

ी टाऊन’चे अनेक सेलिब्रिटी असे आहेत की, ज्यांनी काही काळ नैराश्यात घालवला आहे. दिपीका पादुकोण हिने स्वत: हा नैराश्याच काळ अनुभवला आहे. त्यातून बाहेर यायला बराच कालावधी लागतो असेही तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. आता आलियाची बहीण शाहीन भट्ट तिच्या नैराश्यातील दिवसांबद्दल काही सांगू इच्छिते. तिने यासंबंधी इन्स्टाग्रामवर एक संवेदनशील संदेश चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 
 


              

ती म्हणते,‘मी वयाच्या १३ व्या वर्षांपासून माझ्या आयुष्यातील नैराश्याची काळोखछाया सहन करते आहे. हे सर्व काही मी माझ्या नैराश्याविषयी कबुली देतेय असे नव्हे तर केवळ तुमच्यासोबत शेअर क रते आहे. मी खुप मानसिक, भावनिक संघर्षांचा सामना केलेला आहे. मी जे काही सहन केले ते माझ्यासाठी आयुष्यभराचा एक धडाच आहे. काही वेळेस मला आनंदी वाटायचे, तर दुसऱ्याच क्षणी माझ्यातली सर्व सकारात्मक वृत्ती, विचार निघून जायचे. पण, काही काळानंतर मी नैराश्याचा सामना करायला शिकले. त्याकाळात मी अमेरिकन कादंबरीकार रिचार्ड मिचेल याचे साहित्य वाचले. त्यातून मला नैराश्याच्या काळातही स्वत:मधली सकारात्मकता कशी टिकवून ठेवायची? हे कळाले. नैराश्याच्या काळोखात असताना मला व्यक्त होण्यासाठी केवळ सोशल मीडियानेच मला मदत केली.’










    

Web Title: 'I am frustrating from the 13th year', Shahin Bhatt reveals