'ऑपरेशन सिंदूर'च्या जवानांना भेटण्यासाठी जम्मू-काश्मीरला पोहचली हुमा कुरैशी, शौर्याला केला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:23 IST2025-05-29T10:22:41+5:302025-05-29T10:23:16+5:30
Huma Qureshi : 'ऑपरेशन सिंदूर'साठी जम्मूमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भेटण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचली होती.

'ऑपरेशन सिंदूर'च्या जवानांना भेटण्यासाठी जम्मू-काश्मीरला पोहचली हुमा कुरैशी, शौर्याला केला सलाम
'ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor)साठी जम्मूमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भेटण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचली होती. बुधवारी हुमा जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गेली जिथे तिने ऑक्ट्रॉय पोस्टवर बीएसएफ जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला.
हुमा कुरेशीने यावेळी बीएसएफचे आभार मानले. यावेळी ती म्हणाली की, ''तिला पुन्हा एकदा जाणवले की सैनिक आपल्या सीमांचे रक्षण करत आहेत, यासाठी आपण किती भाग्यवान आहोत. हुमा म्हणाली की, 'आज आपण भारत-पाकिस्तान सीमेवर उभे आहोत आणि ही सामान्य भूमी नाही. ही भूमी तुमच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे.''
पुन्हा एकदा आम्हाला आठवण करून दिली....
हुमा कुरैशी पुढे म्हणाली की, ''सीमा सुरक्षा दल संपूर्ण देशाचे रक्षण करते आणि तुमच्या शौर्यामुळेच आपल्या सीमेवर शांतता आहे. त्यासाठी आर्मीचे आभार. या देशासाठी तुम्ही दिलेल्या त्यागासाठी तुमच्या सर्वांचे आभार मानते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, माझे जम्मू आणि काश्मीरशी एक विशेष नाते आहे. माझी आई काश्मीरची आहे. म्हणूनच मी जम्मू आणि काश्मीरला माझे घर मानते. पण अलीकडे जे काही घडले त्याने पुन्हा एकदा आम्हाला आठवण करून दिली की, आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी तुमचे बलिदान किती महत्त्वाचे आहे.''
भीतीला जम्मू आणि काश्मीरची ओळख बनू देऊ नका
हुमा म्हणाली, ''आज जम्मू आणि काश्मीर ताकद आणि एकतेने उभे आहे आणि सुरक्षा दलांच्या शौर्यामुळे जम्मू आणि काश्मीर भारताचा कणा आहे. म्हणूनच मी माझ्या मनापासून बीएसएफ सैनिक, आर्मीतल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम करते. जम्मू आणि काश्मीर एक स्वर्ग आहे. माता वैष्णो देवी, शिव खीरी, पटनी टॉप, सनासर आणि सुंदर रणजित सागर तलाव आणि भद्रवाह. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक कथा आहे जी श्रद्धा आणि सौंदर्याशी संबंधित आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की भीतीला जम्मू आणि काश्मीरची ओळख बनू देऊ नका. जगाला जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची खऱ्या अर्थाने परिभाषित करणारी शांती, शक्ती आणि प्रेम पाहू द्या.''
भारत माता जयच्या दिल्या घोषणा
हुमा कुरेशीची ही जम्मू भेट जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाने आयोजित केली होती. तिच्या भेटीचा उद्देश बीएसएफच्या शौर्याला सलाम करणे हा होता. यासोबतच हुमा पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या परिसरातील लोकांनाही भेटली. ती सीमेवर राहणाऱ्या लोकांना भेटला आणि भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या.