हुमा कुरेशीने शेअर केलेले व्हिडीओ पाहून जिम ट्रेनरवर भडकले फॅन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:06 IST2019-07-08T15:05:10+5:302019-07-08T15:06:15+5:30

‘गँग ऑफ वासेपूर 2’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या जिममध्ये घाम गाळतेय. जिममधील हुमाचे ट्रेनिंग इतके टफ आहे की, ते करताना हुमाची प्रचंड दमछाक होतेय. पण बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे म्हटल्यावर या ट्रेनिंगला पर्याय नाही, हे हुमाला चांगलेच कळून चुकलेय.

huma qureshi leg press workout fans got angry | हुमा कुरेशीने शेअर केलेले व्हिडीओ पाहून जिम ट्रेनरवर भडकले फॅन्स!

हुमा कुरेशीने शेअर केलेले व्हिडीओ पाहून जिम ट्रेनरवर भडकले फॅन्स!

ठळक मुद्देहुमाने आत्तापर्यंत एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

‘गँग ऑफ वासेपूर 2’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या जिममध्ये घाम गाळतेय. जिममधील हुमाचे ट्रेनिंग इतके टफ आहे की, ते करताना हुमाची प्रचंड दमछाक होतेय. पण बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे म्हटल्यावर या ट्रेनिंगला पर्याय नाही, हे हुमाला चांगलेच कळून चुकलेय. त्यामुळे सध्या तरी हुमाच्या सोशल मीडिया अकाऊंट फक्त आणि फक्त तिचे वर्कआऊट व्हिडीओ दिसत आहेत. यातील एका व्हिडीओत हुमा हेवी लेग वर्कआऊट करताना दिसतेय. पण या वर्कआऊटदरम्यान हुमासोबत असे काही झाले की, लोकांनी जिम ट्रेनरलाच फैलावर घेतले.


हुमाने एकापाठोपाठ एक असे तीन व्हिडीओ शेअर केलेत. यात हुमा 245 किलो वजनासह वर्कआऊट करतेय. पण हे वर्कआऊट इतके टफ आहे की, हुमाचे पाय अचानक थांबले आणि नेमके हेच पाहून चाहते भडकले. ‘इतक्या हेवी वेट एक्सरसाईजची गरजच काय?’ असा प्रश्न अनेक चाहत्यांनी केला. अनेकांनी यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे सांगत हुमाला सावध केले.


हुमा तिच्या वाढत्या वजनामुळे कायम टीकेची धनी ठरत आलीय. अर्थात हुमाने कधीच या टीकेकडे लक्ष दिले नाही. पण काळासोबत बदल गरजेचा असतो. विशेषत: ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकायचे तर हा बदल अतिआवश्यक ठरतो. त्यामुळेच काहीही करून वजन कमी करायचेच या जिद्दीला ती पेटलीय. आता ही जिद्द हुमाला भारी पडू नये म्हणजे मिळवले.

हुमाने आत्तापर्यंत एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या ती ‘लीला’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या वेबसीरिजमध्ये हुमाने दमदार भूमिका साकारली आहे.

Web Title: huma qureshi leg press workout fans got angry