हृतिक, जॅकीसोबत काम करायला आवडेल -साहिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 18:12 IST2016-11-24T18:12:17+5:302016-11-24T18:12:17+5:30

जायेद खान आणि दिया मिर्झा यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’ चित्रपट आठवतोय का? या चित्रपटाचा दिग्दर्शक साहिल ...

Hrithik, would like to work with Jackie-Sahil | हृतिक, जॅकीसोबत काम करायला आवडेल -साहिल

हृतिक, जॅकीसोबत काम करायला आवडेल -साहिल

येद खान आणि दिया मिर्झा यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’ चित्रपट आठवतोय का? या चित्रपटाचा दिग्दर्शक साहिल संघाने हृतिक रोशन आणि जॅकलीन फर्नांडिस या फ्रेश जोडीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप जॅकी आणि हृतिक यांच्याकडून ग्रीन सिग्नल येणं बाकी आहे. ते म्हणतात,‘या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव खरंच खुप अदभुत आहे. ते दोघेही गुणी कलाकार आहेत. त्यांच्या कामाचे ते १०० टक्के देतात. मी शूट केलेल्या एका  डेकॉर ब्रँडच्या जाहीरातीमध्ये जॅकलीन आणि हृतिक यांना एकत्र काम केले आहे.’ 

साहिल पुढे म्हणाले,‘ही जाहिरात ‘बँग बँग’ अभिनेता हृतिक रोशन आणि ‘किक’ अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्या रोमान्स अ‍ॅक्शनने ओळखली जात आहे. दोघांच्याही बेस्ट डान्स क्वालिटीचा या जाहीरातीत उपयोग करून घेतला आहे. मला या जाहीरातीचा प्रभाव प्रेक्षकांवर पडणे अपेक्षित होते. त्यामुळे मी जोडी देखील नवी आणि फ्रेश निवडली होती. आता त्यांच्यासोबत चित्रपट साकारण्याची माझी इच्छा असून ती त्यांना आवडली तरच ती पूर्ण होईल असे वाटतेय.’

Web Title: Hrithik, would like to work with Jackie-Sahil