हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही ‘डर’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 19:31 IST2018-07-02T19:30:41+5:302018-07-02T19:31:11+5:30

अभिनय ते लेखन असा प्रवास करणाऱ्यांमध्ये ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान अशी एक ना अनेक नावे घेता येतील. आता यात आणखी एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे हृतिक रोशन.

Hrithik to share his memoirs with the world; Kangana needn't be scared | हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही ‘डर’!!

हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही ‘डर’!!

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची नावे लेखकांच्या यादीत सामील आहेत. अभिनय ते लेखन असा प्रवास करणाऱ्यांमध्ये ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान अशी एक ना अनेक नावे घेता येतील. आता यात आणखी एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे हृतिक रोशन. होय, हृतिक रोशन लवकरच स्वत:च्या आयुष्यावर पुस्तक लिहिणार असल्याचे कळतेय. आपली कथा जगापुढे आणण्यास हृतिक सज्ज झाला आहे. निश्चितपणे हृतिकच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण एका व्यक्तिला मात्र यामुळे धडकी भरू शकते. ती कोण तर कंगना राणौत. होय, कंगना व हृतिक यांची ‘अजब पे्रम की गजब कहानी’ सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा कायदेशीर वाद, त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप -प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे सगळेच काही जगजाहिर आहे. हृतिक आपल्या आयुष्याचा खुलासा करणार म्हटल्यावर हे सगळे पुन्हा एकदा बाहेर येणार, अशी धास्ती कंगनाला वाटू शकते. पण कंगनाला धास्ती वाटण्याचे काहीच कारण नाही. होय, कारण हृतिकच्या निकटस्थ सूत्रांचे मानाल तर, कंगनाशिवायही हृतिकजवळ जगाला सांगण्यासारखे खूप काही आहे. त्याचे अख्खे आयुष्य प्रेरणादायी राहिले आहे आणि खरे तर त्यात तथ्यही आहे.
हृतिक लहानपणापासून अडखळत बोलायचा. शालेय जीवनात ही समस्या आणखी वाढली. इतकी की, एक शब्दही तो नीट बोलू शकत नव्हता. पण हृतिकने प्रयत्नांनी या समस्येवर मात केली. यानंतर चित्रपटात स्टंट सीन करताना हृतिकला गंभीर दुखापत झाली.  तो चालूही शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगून टाकले होते. पण यातूनही हृतिक बाहेर पडला. नेमका या व अशा अनेक प्रेरणादायी घटना हृतिक जगापुढे आणणार आहे. कधी, हे मात्र तूर्तास सांगता येणार नाही.

 

 

Web Title: Hrithik to share his memoirs with the world; Kangana needn't be scared