Hrithik Roshan : दोन मुलांना घेऊन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत क्रिसमस व्हॅकेशनवर गेला हृतिक रोशन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 01:34 PM2022-12-20T13:34:57+5:302022-12-20T13:41:09+5:30

हृतिकचा सबा आणि मुलांसोबतचा विमानतळावरील व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

Hrithik Roshan with girl friend Saba Azad and kids leave for christmas holidays watch video | Hrithik Roshan : दोन मुलांना घेऊन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत क्रिसमस व्हॅकेशनवर गेला हृतिक रोशन, व्हिडीओ व्हायरल

Hrithik Roshan : दोन मुलांना घेऊन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत क्रिसमस व्हॅकेशनवर गेला हृतिक रोशन, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

अभिनेता हृतिक रोशन आपल्या मुलांना घेऊन व्हॅकेशनवर गेला आहे. फरक इतकाच की यावेळी ख्रिसमसच्या सुट्टीत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझादही त्यांच्यासोबत आहे. मुलगा रेहान आणि रिदान दोघेही हृतिकसोबत दिसत आहेत. हृतिक आणि त्याच्या कुटुंबाचा विमानतळावरील व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

हृतिक म्हणाला- मी पळतोय
हृतिक रोशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पापाराझी त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसातेय. अभिनेता म्हणतो, 'आम्हाला उशीर झाला आहे. आम्ही पळतोय. या व्हिडिओमध्ये या चौघांव्यतिरिक्त त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे.

 

हृतिक आणि सुजैनचा २०१४मध्ये झाला होता घटस्फोट
हृतिक आणि सुजैनने 2000 मध्ये लग्न केले आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना रेहान आणि रायदान ही दोन मुलं आहेत. हृतिक सबाला डेट करत आहे, तर सुझैन अर्सलानला डेट करत आहे आणि चौघींचाही एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग आहे.

कोण आहे सबा?
1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला.
तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.

Web Title: Hrithik Roshan with girl friend Saba Azad and kids leave for christmas holidays watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.