Happy Anniversary म्हणत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादसाठी पोस्ट, Ex पत्नी सुजैन कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:03 IST2024-10-02T12:02:25+5:302024-10-02T12:03:35+5:30

हृतिकने सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती.  EX पत्नी सुजैन खानने देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.

Hrithik Roshan Wishes Girlfriend Saba Azad Happy Anniversary shared photo Ex Wife Sussanne khan Commented | Happy Anniversary म्हणत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादसाठी पोस्ट, Ex पत्नी सुजैन कमेंट करत म्हणाली...

Happy Anniversary म्हणत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादसाठी पोस्ट, Ex पत्नी सुजैन कमेंट करत म्हणाली...

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणारा हा हँडसम हंक त्याच्या बॉलिवूड करिअरपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असतो. हृतिक सध्या गर्लफ्रेंड सबा आजादसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक पार्टी आणि इव्हेंटमध्येही ते एकत्र दिसतात. हृतिकने सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. 

मंगळवारी(१ ऑक्टोबर) हृतिकने सबाबरोबरचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. या फोटोला त्याने "Happy Anniversary Partner" असं कॅप्शन दिलं होतं. या कॅप्टनमध्ये त्याने "1.10.2024" अशी तारीखही टाकली होती. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. त्याबरोबरच हृतिकची EX पत्नी सुजैन खानने देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तिच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


हृतिकच्या या पोस्टवर सुजैन खानने "सुंदर फोटो, हॅपी अॅनिवर्सरी" अशी कमेंट केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हृतिक आणि सबा रिलेशनशिपमध्ये आहेत. हृतिकने सुजैन खानशी २००० साली लग्न केलं होतं. लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना रिहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. सध्या सुजैन अर्सलानल डेट करत आहे. 

Web Title: Hrithik Roshan Wishes Girlfriend Saba Azad Happy Anniversary shared photo Ex Wife Sussanne khan Commented