हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'क्रिश 4' सिनेमाचं समोर आलं मोठं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:49 PM2024-03-26T16:49:11+5:302024-03-26T16:51:18+5:30

हृतिकच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

Hrithik Roshan Starrer Krrish 4 Shoot To Start In 2025 | हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'क्रिश 4' सिनेमाचं समोर आलं मोठं अपडेट

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'क्रिश 4' सिनेमाचं समोर आलं मोठं अपडेट

अभिनेता हृतिक रोशनचा 'फायटर' सिनेमा नुकतेच रिलीज झाला. सिनेमात हृतिकच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.  सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी केली. यातच आता हृतिकच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. हृतिकचा गाजलेला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ज्या सिनेमाचे फॅन्स आहेत, अशा 'क्रिश 4' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'क्रिश 4' ची वाट बघणाऱ्या सर्व जनतेसाठी सिनेमासंदर्भातील एक मोठं अपडेट समोर आलं आहे

'क्रिश 4' सिनेमाच्या निर्मितीचं काम डिसेंबर 2024 पूर्वी सुरू होणार नाही, असं म्हटलं जात होतं. पण, आता  'वॉर 2'च्या शूटिंगसोबतच हृतिक रोशन 'क्रिश 4'चीही तयारी करणार असल्याचे बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.  या चित्रपटाच्या तयारीसाठी हृतिकने त्याचं वेळापत्रक निश्चित केलं आहे.  'क्रिश 4' सिनेमातून राकेश आणि हृतिक रोशन चाहत्यांना एक विलक्षण अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सिनेमाची कथा ही लोकांच्या विचार आणि अपेक्षांच्या पलीकडची असल्याचं म्हटलं जात आहे. 

चित्रपटाचं कथानक काय असेल याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण, 'क्रिश 4' अंतराळ प्रवासावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होणार आहे.  चित्रपटामध्ये असे काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स दाखवण्यात येतील असतील, जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. 'क्रिश ४' फ्रँचायझीचा सर्वात मोठा चित्रपट असेल. म्हणजे 'फायटर' नंतर हृतिकचे आणखी दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 
 

Web Title: Hrithik Roshan Starrer Krrish 4 Shoot To Start In 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.